Friday , November 6 2026
Breaking News

बेळगावच्या प्रस्तावित आयटी पार्कच्या जागेची आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्याकडून पाहणी

Spread the love

 

अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना; पारदर्शकता आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या प्रस्तावित आयटी पार्कच्या जागेची बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे (बुडा) अध्यक्ष आणि बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत युवा नेते अमान सेठ आणि बुडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान आमदार सेठ यांनी प्रस्तावित आयटी पार्कच्या जागेची माहिती घेतली आणि प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेसंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रक्रिया नियमानुसार पूर्ण कराव्यात, संभाव्य अडचणींचे वेळीच निराकरण करावे आणि संपूर्ण कामकाज पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावे, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रस्तावित आयटी पार्कमुळे बेळगाव शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याबरोबरच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. तसेच शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळून बेळगावच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीला हातभार लागेल, असा विश्वास आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखणे आवश्यक आहे. संबंधित नियमांचे काटेकोर पालन करून प्रकल्पाची प्रक्रिया पुढे न्यावी. कामकाजात कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

बेळगाव शहराचा दीर्घकालीन विकास आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षतेने काम करावे, तसेच प्रस्तावित आयटी पार्कचा प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने पुढे न्यावा, असे आवाहन आमदार सेठ यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *