Friday , November 6 2026
Breaking News

क्रीडांगणे गाजवली अन् म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या ‘दहा सुकन्यां’नी राज्यस्तरीय खेळाच्या महासंग्रामध्ये धडक मारली!

Spread the love

 

खानापूर : जिद्द, चपळाई आणि खेळावरील अफाट प्रेमाच्या जोरावर खानापूरच्या क्रीडाक्षितीजावर म मं ताराराणी पी.यू. कॉलेजच्या सुकन्यांनी ऐतिहासिक रोमहर्षक यश संपादन केले आहे. तालुका आणि जिल्हास्तरीय क्रीडांगणांवर आपल्या चपळाईची आणि कौशल्याची जादू दाखवत, महाविद्यालयाच्या तब्बल दहा विद्यार्थिनींची थेट राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपली निवड स्वबळावर शिध्द केली आहे हा संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचा सुवर्णक्षण ठरला आहे.

कठोर परिश्रम आणि उच्च दर्जाच्या खेळामुळे या विद्यार्थिनींनी विविध खेळांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले असून, अत्यंत वेगवान हालचाली आणि उत्कृष्ट सांघिक खेळाच्या बळावर अपेक्षा निलजकर, लक्ष्मी हंगिरकर आणि गंगा कुकडोळकर या तीन खेळाडूंनी राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे “बेंगळुरू” तिकीट मिळविले आहे.
तसेच अचूक पकड आणि भेदक थ्रोच्या जोरावर गायत्री गुरव, प्रणाली चुडेकर, राजश्री गावडा आणि मीनाक्षी गुरव या चौघींनी राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी “रामनगर-बेंगळूर” येथे मजल मारली आहे,
तर अंगात वीज संचारल्यासारखी चपळाई मर्दांणी खेळ करीत जबरदस्त पकडीच्या जोरावर पल्लवी पाटील, दिव्या शिरोडकर आणि रेणुका गुरव या तीन शिलेदारांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी “हावेरी “ येथे होणाऱ्या रणसंग्रामात आपले स्थान पक्के केले आहे .
म.मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेचे माहेरघर नसून कला, क्रीडा आणि अभ्यासाचा एक अप्रतिम संगम आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा अचूक विकास करण्यासाठी येथील क्रीडा प्रशिक्षक प्रशांत पांखरेसह प्राध्यापकवर्ग सदैव तत्पर असतात. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य अरविंद पाटील, संचालक श्री. शिवाजीराव पाटील आणि श्री. परशराम गुरव यांच्या सततच्या प्रोत्साहनाखाली हे खेळाडू राज्यस्तरीय महासंग्रामत तगड़ी टक्कर देण्यासाठी सकाळ संध्याकाळ कसून सराव करीत असून या अगोदर त्यांनी तालुका व जिल्हास्तरीय क्रीडांगणांवर आपल्या खेळाच्या निस्सीम ताकदीवर क्रीडांगणे ‘ताराराणीमय’ करून टाकली होती.
आज राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या या दहाही सुकन्यांचे महाविद्यालयातर्फे जोरदार अभिनंदन करण्यात आले असून, अ‍ॅथलेटिक्ससह सर्वच खेळांमध्ये त्यांनी अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारून महाविद्यालयाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरावे अशा मनःपूर्वक शुभेच्छा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून यांना देण्यात आल्या
आता या दहाही जहांबाज खेळाडू विद्यार्थ्यिनी राज्यभरातील आगामी होणाऱ्या विविध क्रीडांगणावर इतिहास रचण्यासाठी जोरदार तयारी करीत आहेत. सध्याच्या त्यांच्या या रोमहर्षक प्रवासाने संपूर्ण खानापूर तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *