



नंदगड : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने नंदगड विभाग व परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून कर्नाटक राज्योत्सवाचा निषेध करावा, तसेच उद्योग-व्यवसाय बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन समितीने केले.
भाषावार प्रांतरचनेत मराठी भाषिकबहुल प्रदेश कर्नाटकात समाविष्ट केल्याने सीमाभागातील मराठी जनतेवर अन्याय झाला आहे. सीमाप्रश्न अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने मराठी भाषिकांनी आपली एकजूट कायम ठेवून लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन समितीने केले.
या मोहिमेत समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, डी. एम. भोसले, रणजीत पाटील, अनंत गुरव, रवळू फठाण, महादेव पाटील, सौ. सविता जाधव, सौ. शोभा कोंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Belgaum Varta Belgaum Varta