Tuesday , September 17 2024
Breaking News

संकेश्वर

अंकले विहिरीचे पाणी कुरणं गोशाळेला..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत विहिरीचे पाणी कुरणं गोशाळेला देण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आल्याची माहिती अंकले ग्रामपंचायतचे अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, निडसोसी मठातर्फे कुरणं येथील गो-शाळा चालविली जाते. गोशाळेतील गायींना शुध्द पिण्याचे पाणी अंकले ग्रामपंचायतच्या विहिरीतून मिळवून देण्याची मागणी मठातर्फे …

Read More »

ए. बी. पाटील यांचं उत्तर….?

संकेश्वर (महंमद मोमीन) : माजी मंत्री ए. बी. पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक बेळगांव उत्तर मतक्षेत्रातून लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलेली दिसत आहे. याविषयी अद्याप तरी ए. बी. पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ए. बी. यांचं उत्तर? काय असणार यांचे औत्सुक्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले दिसत आहे. …

Read More »

संकेश्वरात रस्त्यांची वाट लागलीयं….!

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील बरेच रस्ते पावसाच्या पाण्याने उखडलेले दिसताहेत. बऱ्याच रस्त्यांची चाळण झाल्याने दुचाकी चारचाकी तसेच ॲटोरिक्षा चालकांची चांगलीच गैरसोय होतांना दिसत आहे. खड्डेमय रस्त्यांत पावसाचे पाणी साचून रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झालेले दिसत आहे. येथील प्रभाग क्रमांक ४ मधील अंबिका नगरला जाणारा रस्ता चांगलाच गैरसोयीचा बनलेला …

Read More »

बसवेश्वरांचे वचन साहित्य समाजाला दिशा देणारे : प्रा. व्ही. बी. पाटील

  संकेश्वर (महंमद मोमीन) : विश्वगुरु श्री बसवेश्वरांचे वचन साहित्य समाजाला दिशा देणारे असल्याचे मजलट्टी सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सभामंडप येथे गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित एकदिवसीय विशेष व्याख्यान कार्यक्रमात वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला दिव्य सानिध्य बैलूरचे परमपूज्य श्री बसव चेतन देवरु …

Read More »

माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या वाढदिवस वृध्दांना शाल वाटपाने साजरा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सिल्व्हर डेल वृध्दाश्रमातील वृध्दांना वूलन शॉल वाटपाने माजी मंत्री ए. बी. पाटील यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्थेचे संचालक बसनगौडा पाटील यांचेमार्फत शॉल वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सिल्व्हर डेल वृध्दाश्रमाच्या प्रमुख क्विझंटी यांनी बसनगौडा पाटील …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर श्रींच्या भेटीला..

संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव ग्रामीण मतक्षेत्राच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज निडसोसी श्री दुरदुंडीश्वर सिध्द संस्थान मठाला भेट देऊन देवदर्शनासह मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींची भेट घेऊन श्रींच्या आरोग्याची विचारपूस केली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर स्वामीजींबरोबर बोलताना म्हणाल्या, स्वामीजी तुमच्या इनोव्हाला अपघात झाल्याचे समजताच आपणाला धक्काच बसला. तुम्ही अपघातात सुखरुप …

Read More »

संकेश्वरातील नेहरु रस्त्याचे रुंदीकरण कधी….?

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नेहरु रस्ता रुंदीकरणाचे कार्य हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे युवानेते बसनगौडा पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले संकेश्वरच्या जुन्या गावात नेहरु रस्ता, सुभाष रस्ता ही बाजारपेठ समजली जायची. संकेश्वर गावाचा विस्तार वाढत गेला तशी बाजारपेठ जुन्या पी. बी. रोड, कमतनूर वेस ते लक्ष्मी बेकरी …

Read More »

संकेश्वरात आगीच्या दुर्घटनेत स्टेशनरी-किराणा दुकानाचे लाखोंचे नुकसान

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नेहरु रस्ता येथील अरविंद कुलकर्णी यांचे सेंट्रल स्टोअर्स आणि गजानन रत्नप्पा मेहतर यांच्या किराणा दुकानाला आज सकाळी ६ वाजता शाॅर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची दुर्घटना नेमकी कशामुळे घडली यांची चौकशी संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी …

Read More »

शिडल्याळींची आरोग्य सेवा गरीबांना लाभदायक ठरावी : रमेश कत्ती

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात शिडल्याळींची आरोग्य सेवा गोरगरिबांना लाभदायक ठरावी, असे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते शिडल्याळी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. श्रींच्या व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने समारंभाची …

Read More »

संकेश्वरात चर्चेतील “पाखऱ्या “…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बेंदूर निमित्त सदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत करजगा येथील शिवानंद हिरेकोडी यांचा पाखऱ्या बैल चांगलाच लक्षवेधी आणि चर्चेत दिसला. पाखऱ्याचा तो रुबाब स्पर्धा संयोजकांना आणि उपस्थित शेतकऱ्यांना देखील चांगलाच भावलेला दिसला. सेकीन होसूर येथील प्रतिष्ठित शेतकरी देवेगौडा पाटील यांनी राजा-पाखऱ्या बैलजोडीला सदढ …

Read More »