Monday , September 21 2026
Breaking News

संकेश्वर स्विमिंग ग्रुपतर्फे शिवअष्टोत्तर पूजा

Spread the love

 


संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर स्विमिंग ग्रुपतर्फे ग्रामदैवत श्री शंकराचार्य मठात श्रावण मासारंभ निमित्त शिवअष्टोत्तर (शतकावली) पूजा आरंभ करण्यात आली आहे.
शिवअष्टोत्तर पूजा पुरोहित वामन पुराणिक यांच्याकडून केली जात आहे. ते दररोज सकाळी ७ वाजता संपूर्ण श्रावणमासमध्ये शिव अष्टोत्तर पूजा करणार आहेत. त्यांनी स्विमिंग ग्रुपच्या सदस्यांना शिवकालीन शिवअष्टोत्तर पूजेचे महत्व समजावून सांगून सर्वांच्याकडून पूजा करून घेतली. यावेळी पुरोहित वामन पुराणिक यांच्यासमवेत स्विमिंग ग्रुपचे अशोक मस्तीहोळीमठ, सुहास कुलकर्णी, पुष्पराज माने, राजू शिंदे, संजय कोळेकर, रामण्णा मुरचट्टी, मल्लीकार्जुन शिरहट्टी, शिवानंद पाटील उपस्थित होते. संपूर्ण श्रावण मास ही पूजा करण्यात येणार आहे. तरी ज्या भक्तांना या पूजेमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी सकाळी सात वाजता श्री शंकराचार्य मठाच्या हिरण्यकेशी नदी घाटावर उपस्थित राहायचे आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *