Sunday , July 26 2026
Breaking News

माझं “उत्तर” हुक्केरीतून लढत : ए. बी. पाटील

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : उत्तर -बित्तर कांहीं नाहीं. मी हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून लढत देणार असल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते राज्यांचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्सव निमित्त आयोजित सभेला उद्देशून बोलत होते. सभेत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळ्याला हुक्केरी आणि संकेश्वर घटक काॅंग्रेसचे हजारो कार्यकर्ते अभिमानी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. सभेला उद्देशून बोलताना माजी मंत्री ए. बी. पाटील पुढे म्हणाले, आपण बेळगाव उत्तर मतक्षेत्रातून निवडणूक लढविणार असल्याची अफवा पसरवली गेली आहे. ही अफवा भाजपाकडून पसरवली जात आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. मी हुक्केरी विधानसभा मतदारसंघातूनच लढत देणार आहे. त्याच्या तयारीला संकेश्वर हुक्केरी घटक काॅंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि अभिमनींनी लागावे, असे त्यांनी सांगितले. सभेत देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन भव्य बाईक रॅलींने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, श्रीमती रेखा चिकोडी, निलेश जाधव, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, चिदानंद कर्देण्णावर, विनोद नाईक, प्रशांत कोळी, चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी, राजू गावडे, दिलीप होसमनी, संकेश्वर घटक अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष मुस्तफा मकानदार, रियाज फणीबंद, बाबू भूसगोळ, विजय तोडकर, बसू बोरगली काॅंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते अभिमानी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *