Monday , September 21 2026
Breaking News

संकेश्वरात चर्चेतील नामदेव महिला मंडळाचा माऊली नृत्याविष्कार

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात नुकताच श्री नामदेव शिंपी दैवकी समाजातर्फे संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सोहळ्यात सायंकाळी गांधी चौक येथे नामदेव महिला मंडळाने सादर केलेले शानदार नृत्य लोकांच्या पसंतीला उतरलेले दिसत आहे. सोशल मिडियावर नामदेव महिला मंडळाचे नृत्य चांगलेच गाजत आहे. मराठी चित्रपट लय भारी मधील संगितकार अजय-अतुल यांच्या विठ्ठल विठ्ठल, तुला साद घाली तुला लेकरांची या गाण्याच्या ठेक्यावर महिलांनी टाळांच्या गजरात शानदार नृत्याविष्कार सादर केला आहे. यामध्ये नामदेव महिला मंडळाच्या पंचवीस महिलांनी मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. नृत्याचे दिग्दर्शन कुमारी वैष्णवी मुळे यांनी अत्यंत सुंदररित्या केलेले दिसत आहे. सोशल मिडियाने नृत्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली असून लोकांना नृत्याविष्कार भावलेला दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *