Friday , April 17 2026
Breaking News

संकेश्वरात पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला सहमती

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिका सभेत संकेश्वरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. सभेला प्रदुर्षण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. रमेश, मुख्याधिकारी आर. सी. चौगुला, पालिकेचे एस. बी. तोडकर यांनी मार्गदर्शन केले. प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तीला निर्बंध, फटाके वाजविण्यास मनाई, शाडूच्या गणेशमूर्तींला अनुमती देण्यात आली. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे म्हणाले, संकेश्वरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बाहेर गावातून विक्रीसाठी दाखल होतात. संकेश्वर गाव सिमेवर असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती रोखणे कठीण आहे. येथील गणेश मूर्तीकारांचा व्यवसायाचा विचार करता पीओंपीचे निर्बंध शितल करण्याविषयी त्यांनी सांगितले. प्रत्येक वर्षी सभेत निव्वळ चर्चा केली जाते अंमलबजावणी कांहींच होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभेत उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, नंदू मुडशी, माजी नगरसेवक दिलीप होसमनी, ॲड. संतोष नेसरी, प्रशांत कोळी, कुमार कब्बूरी, संदिप दवडते, गणेश कणगली यांनी आपले विचार मांडले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना निःशुल्क परवानगी

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी अजिबात पैसे मोजावे लागणार नाहीत. संकेश्वर पालिका आणि पोलिस ठाण्यातर्फे निःशुल्क परवानगी देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

निलगार गणेशोत्सवात भक्तांची सोय होणार..

संकेश्वरातील नवसाला पावणारा निलगार गणेशोत्सव कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे बंद होता. यावर्षी निलगार गणेशोत्सव होत असल्याने भक्तगणांची वाढती संख्या लक्षात घेता आझाद रस्ता गांधी चौक ते हेद्दुरशेट्टी गल्ली दरम्यान थाटण्यात येणारी दुकाने महालक्ष्मी मंदिर पटांगणात एकाच ठिकाणी थाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निलगार गणपती दर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचबरोबर निलगार गणेशोत्सवात होणारी फटाक्यांची तुफान आताषबाजी पूर्णपणे रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निलगारला फटाक्यांचा नवस नको..

पर्यावरण प्रेमी ॲड. संतोष नेसरी म्हणाले, नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला भक्तगणांनी फटाक्यांचा नवस बोलू नये. निलगारला फटाक्यांचा नवस बोलून प्रदूर्षणात भर टाकण्याचे पाप कोणी करु नये. निलगार गणेश उत्सवात फटाके बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे भेसळ पेढे विक्रीला रोखथाम घालण्याचे कार्य होण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रीन फटाक्यांची आतषबाजी

मुख्याधिकारी आर. सी. चौगुला म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके विक्री करण्यास बंदी राहणारे आहे. बेळगांव जिल्हाधिकारी यांनी सुचित केलेल्या मार्गसूचीनुसार ग्रीन फटाक्यांच्या आतषबाजीला परवानगी दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभेला माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, ए.एस.आय अशोक बजंत्री, नगरसेवक संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी, ॲड. प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, सचिन भोपळे, चिदानंद कर्देण्णावर, नंदू मुडशी, संदिप दवडते, कुमार कब्बूरी, प्रशांत कोळी, महादेव हेद्दुरशेट्टी, अप्पासाहेब हेद्दुरशेट्टी, जगदीश शेट्टीमनी, कुणाल पोतदार, सॅंडी बांबरे, गणेश मूर्तीकार, गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि आभार एस. बी. तोडकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षे कारावास; १ लाख रुपये दंड

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शंकर नगर येथील आरोपी दर्शन भगवंत हुणश्याळी (वय २३) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *