Monday , September 21 2026
Breaking News

बैलहोंगलजवळील बैलवाड क्रॉसजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात; एक ठार

Spread the love

 

बेळगाव : बैलहोंगलजवळील बैलवाड क्रॉसजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात होऊन दुचाकीस्वारांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सौंदत्ती येथील गडीगेप्पा कल्लाप्पा हवालदार (62) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौंदत्तीहून नेगीनहाळ येथे जात असताना त्याच मार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला त्यांची धडक बसल्याने हा अपघात झाला. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होत असलेल्या गडीगेप्पाचा जागीच मृत्यू झाला. नेगीनहाळ येथे तीन वर्षाच्या चिमुकलीवर उपचार करून घरी परतणाऱ्या व्यक्ती, एक महिला व तीन वर्षांचा बालक जखमी झाल्याचेही समजते. बैलहोंगल सीपीआय
यु. एच. सातनहळी, पीएसआय प्रवीण कोटी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी बैलहोंगल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *