Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

धजदला चार जागा देण्यास भाजप अनुकूल

  धजदची सात जागांची मागणी; देवेगौडा, कुमारस्वामींची पंतप्रधान मोदींशी चर्चा बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्याचा निर्णय घेतलेल्या धजद आणि भाजप यांच्यातील जागावाटप प्रक्रिया आज जवळपास अंतिम झाली. भाजप नेते लोकसभेच्या चार जागा धजदला देण्यास इच्छुक आहेत. दरम्यान धजदचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व माजी मुख्यमंत्री …

Read More »

‘अरिहंत’च्या कुन्नुर शाखेचा वर्धापन दिन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सहकारी संघाच्या कुन्नूर शाखेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महेंद्र जाधव यांनी स्वागत केले. सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत दत्त कारखान्याचे संचालक शरदचंद्र पाठक यांच्या हस्ते लक्ष्मी व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उत्तम पाटील यांना कर्नाटक सरकारकडून सहकारत्न पुरस्कार मिळाल्याने …

Read More »

बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातर्फे हेल्मेटबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

  निपाणी (वार्ता) : दुचाकींच्या अपघातामध्ये हेल्मेट आभावी अनेक दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना टाळण्यासाठी येथील बसवेश्वर चौक पोलीस ठाणेतर्फे येथील कन्नड मुलांची शाळा क्रमांक १ मध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सत्याप्पा चिंगळे होते. प्रारंभी मुख्याध्यापक एम. डी. मुल्ला यांनी स्वागत केले. उपनिरीक्षक डी. बी. …

Read More »

श्रीरामलला मंदिर अक्षता कलश शोभायात्रेला निपाणीत उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : अयोध्या मधून येथे आलेल्या रामलला मंदिर अक्षता कलशांची शोभायात्रा अभूतपूर्व उत्साह व चैतन्यमय वातावरणात पार पडली. यामध्ये निपाणीसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी महिलांनी अक्षतांचा मुख्य कलश व निपाणी क्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागात पाठविण्यासाठी ८० मंगल कलशांची बांधणी व सजावट केली होती. सायंकाळी तमनाकवाडा येथील …

Read More »

निपाणी बाजारपेठेत ख्रिसमसच्या खरेदीसाठी गर्दी

  निपाणी (वार्ता) : डिसेंबर सुरू झाला तसा शहराला नाताळची चाहुल लागली आहे. व्यापारी आणि विक्रेत्यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच ख्रिसमसची तयारी सुरू केली आहे. मात्र, आता ख्रिसमस अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठेत ख्रिसमसच्या खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे. निपाणी आणि परिसरात ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने ख्रिसमस साजरा करतात. …

Read More »

राज्याला तातडीने दुष्काळ निवारण निधी मंजूर करा

  मुख्यमंत्री सिध्दरामय्यांची केंद्रीय मंत्री अमित शहांना विनंती बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नैसर्गिक आपत्तींबाबत तातडीने उच्चस्तरीय समितीची बैठक बोलावून राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून २३६ तालुक्यांपैकी २२३ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. सुमारे ४८.१९ लाख …

Read More »

तालुका, जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रिया महिनाभरात शक्य

  राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन बंगळूर : राज्याच्या जिल्हा आणि तालुका पंचायत मतदारसंघाची पुनर्रचना आणि आरक्षण प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, असे आश्वासन सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिले. त्यामुळे येत्या महिनाभरात निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मतदारसंघांची पुनर्रचना आणि आरक्षण निश्चित करण्याचा अधिकार निवडणुक आयोगाकडून परत घेतल्याच्या कारवाईला …

Read More »

वीरभद्रेश्वर मंदिरात श्री भद्रकाली मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम सुरू

  निपाणी (वार्ता) : येथील अकोळ रोड हुडको कॉलनी येथील श्री विरभद्रेश्वर मंदिर येथे विरभद्रश्वर यात्रा, सामुहिक गुग्गुळोत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता.१९) श्री भद्रकाली मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी जगद्गुरू शिवलिंगेश्वर महास्वामी, निडसोशी मठ, प्राणलिंग स्वामी, मल्लिकार्जुन स्वामी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत. मंगळवारी (ता. १९) सकाळी …

Read More »

देसाईवाडा तिवोली येथील गणेश मंदिराचा १५वा वर्धापनदिन उत्साहात

  खानापूर : देसाईवाडा तिवोली येथील गणेश मंदिराचा १५वा वर्धापनदिन मंगळवार दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी देसाईवाडा आणि तिवोली येथील ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते. या छोट्याशा दहा घराच्या वसाहतीमध्ये असे हे गणेश मंदिर उभारले त्याबद्दल मी या ग्रामस्थांचे कौतुक करतो असे तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठलराव …

Read More »

कर्नाटक दुष्काळ निवारणासाठी १८,१७७ कोटी द्या

  सिध्दरामय्यांची पंतप्रधान मोदीना विनंती, पाणीपुरवठा योजनांना मंजूरीचे आवाहन बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना राज्याच्या दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. दुष्काळ निवारणासाठी राज्याला लवकरात लवकर १८,१७७.४४ कोटी रुपये मंजूर करण्याची त्यांनी विनंती केली. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी ४,६६३.१२ कोटी इनपुट सबसिडी, …

Read More »