Tuesday , November 24 2026
Breaking News

कर्नाटक

गर्भावस्थेत आईचे मानसिक आरोग्य महत्त्वाचे

  मीनाक्षी रावसाहेब पाटील; बोरगावमध्ये गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन निपाणी (वार्ता) : गर्भावस्थेत आईचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचार आणि शांत वातावरण गर्भातील बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरते. दीर्घकाळ मोबाईल वापरल्यामुळे मानसिक ताण वाढून झोपेवरही परिणाम होऊ शकतो, असे मत येथील वीतराग महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी …

Read More »

हुन्नरगीमधील बकऱ्यांच्या टक्करीत बेंकी बबलादी बकऱ्याने पटकावले विजेतेपद

  निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील बिरदेव यात्रा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह बकऱ्यांच्या टक्करीचे आयोजन करण्यात आले होते. या टक्करीमध्ये जनरल गटात ‘बेंकी बबलादी’ बकऱ्याने विजेतेपद पटकवले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकाररत्न उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बिन दाती बकऱ्यांच्या टक्करीत हालसिद्धनाथ प्रसन्न -आप्पाचीवाडी, …

Read More »

शेतकऱ्यांच्या विकासासाठी इथेनॉल निर्मितीला चालना द्यावी

  रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार ; इथेनॉल संघर्षमय लढा पुस्तकाचे प्रकाशन निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांना ऊस उत्पादनापासून अपेक्षित दरासाठी प्रतिवर्षी आंदोलने करावी लागत आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाने ठोस धोरण राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासनाने अधिक इथेनॉल निर्मितीला चालना देऊन शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास साधण्यासाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्नदाता …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कै. दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण

    खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष कै. दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेचे प्रास्तविक व सुत्रसंचलन खानापूर तालुका म. ए. समितीचे सहचिटणीस श्री. रणजीत पाटील यांनी केले. कै. दीपक दळवी यांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य श्री. …

Read More »

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना

  अधिकाऱ्यांना नियमित बैठका घेण्याचे निर्देश बंगळूर : ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासल्यास तातडीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, या उद्देशाने पुढील तीन महिन्यांपर्यंत दर महिन्याच्या २ऱ्या व ४थ्या सोमवारी पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) यांच्यासोबत पिण्याच्या पाण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी अनिवार्य बैठक घेण्याचे निर्देश जिल्हा पंचायतांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना …

Read More »

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या निवृत्तीला दहा दिवस असतानाच दुर्दैवी घटना

  बंगळूर : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित छळाला कंटाळून समाज कल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पावगड तालुक्यात घडली आहे. मल्लिकार्जुन (वय ६०), पावगड तालुका समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक, असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांची …

Read More »

रस्त्याकडेच्या चरीत ट्रॉली कोसळून गळतगा येथील चालकाचा दुर्दैवी मृत्यू

  निपाणी (वार्ता) : नवीन ट्रॅक्टरला रोटर जोडून नवीन ट्रॅक्टर कारदगाहून गळतगाकडे घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.२१) सायंकाळी सहा वाजता सुमारास घडली. सुधाकर रावसाहेब कोंडेकर (वय ३८) असे जागीच ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. तर संजय अण्णाप्पा चौगुले …

Read More »

श्रीक्षेत्र स्तवनिधीमध्ये भक्तीमय वातावरणात ब्रह्मदेव पालखी सोहळा 

निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील क्षेत्रपाल ब्रह्मदेव देवाचा अमावस्या आणि पाडव्यानिमित्त पालखी सोहळा भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर निपाणी व परिसरातील भाविकांनी क्षेत्रपालाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी क्षेत्रपालाची पूजा व अभिषेक प्रतिष्ठाचार्य अनिल कुमार कलाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत म पार पडला. …

Read More »

बंधुभाव, एकतेचा संदेश देत निपाणी परिसरात रमजान ईद साजरी

    निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील इदगाह परिसरात अंजुमन कमिटी आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने ईदचा सण शनिवारी (ता.२१) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजता ईदगाह परिसरात सामूहिक नमाज पठण करून अल्लाहची प्रार्थना करण्यात आली. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या आणि …

Read More »

शिरगुप्पी भावेश्वरी पीकेपीएसला धान्य दुकान मंजूरच्या आदेशपत्राचे वाटप

  निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी येथील भावेश्वरी विविधोद्देश ग्रामीण कृषी सहकार संघास स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून मंजूर झालेल्या या धान्य दुकानाच्या आदेश पत्राचे वितरण बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते भावेश्वरी पीकेपीएस पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. सन २०१९ साली सदर पीकेपीएसची सुरुवात होऊन २०२० …

Read More »