Monday , May 25 2026
Breaking News

शिरगुप्पी भावेश्वरी पीकेपीएसला धान्य दुकान मंजूरच्या आदेशपत्राचे वाटप

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी येथील भावेश्वरी विविधोद्देश ग्रामीण कृषी सहकार संघास स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून मंजूर झालेल्या या धान्य दुकानाच्या आदेश पत्राचे वितरण बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते भावेश्वरी पीकेपीएस पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सन २०१९ साली सदर पीकेपीएसची सुरुवात होऊन २०२० पासून सभासद शेतकऱ्यांना कृषी कर्ज पुरवठा सुरू करण्यात आला होता‌ यानंतर स्वस्त धान्य दुकान मंजुरीसाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. अखेर बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या प्रयत्नामुळे स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. त्यासाठी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांचे सहकार्य लाभल्याचे पृथ्वीराज चव्हाण व रावसाहेब गुरव यांनी सांगितले. यावेळी विवेक मोकाशी, बाळू रक्ताडे, बाळू मधाळे, रामचंद्र निकम, धनाजी जाधव, गुलाब देसाई, संभाजी नार्वेकर, अमर देसाई, काशिनाथ नागावकर, यांच्यासह पीकेपीएसचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *