Sunday , July 26 2026
Breaking News

२०२१ मोर्चा खटल्याची तारीख २४ मार्च रोजी; खटल्यातील कार्यकर्त्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : २५ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी कागदपत्रांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा पोलिसी बळावर धर्मवीर संभाजी महाराज चौकात अडविण्यात आला. यावेळी समिती व कार्यकर्त्यांनी चौकातच धरणे धरले तसेच आपल्या मागण्यांवर ठाम राहून घोषणाबाजी केली.

या मोर्चावर पोलिसांनी कोरोना काळाचे निमित्त करून नेते व कार्यकर्त्यांवर कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. या खटल्यात संशयित असलेले बरेचसे कार्यकर्ते न्यायालयात वरचेवर गैरहजर राहत आहेत. या खटल्याची पुढील तारीख मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी असून या खटल्यातील सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन वकील महेश बिर्जे व समिती नेत्यांनी केले आहे.

खटला क्रमांक १४५/२०२१ पाचवे अतिरिक्त न्यायालय बेळगाव येथे वरचेवर गैरहजर राहणाऱ्याना माननीय न्यायालयाने अटक वॉरंट काढणार असल्याची सक्त ताकीद दिली आहे. तरी खटल्यातील मनोहर कल्लाप्पा किनेकर, प्रकाश आप्पाजी मरगाळे, शुभम विक्रांत शेळके, प्रकाश रामचंद्र शिरोळकर, किरण गोविंदराव गावडे, रेणू सुहास किल्लेकर, सरिता विराज पाटील, श्रीकांत नाथाजी मांडेकर, रवी महादेव साळुंखे, धनंजय राजाराम पाटील, मदन बाबुराव बामणे, मालोजी शांताराम अष्टेकर, नेताजी नारायण जाधव, बंडू शंकर केरवाडकर, गजानन पाटील, संदीप सुभाष चौगुले, दिगंबर मारुती कातकर, परेश गोपाळ शिंदे, विनायक यल्लाप्पा सांबरेकर, हनुमंत कृष्णा मजुकर, रामचंद्र शंकर कुद्रेमणीकर, विनायक बाळकृष्ण पावशे, नागेश बळीराम किल्लेकर, उदय नारायण नाईक, अनिल बबन हेगडे, माधुरी अनिल हेगडे, संदीप काशिनाथ मोरे, मल्हारी पावशे, चेतन परिस पाटील, कृष्णा भरमा गुरव, यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *