Monday , May 25 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कै. दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण

Spread the love

 

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष कै. दीपक दळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेचे प्रास्तविक व सुत्रसंचलन खानापूर तालुका म. ए. समितीचे सहचिटणीस श्री. रणजीत पाटील यांनी केले. कै. दीपक दळवी यांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य श्री. राजाराम देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दीपक दळवींच्या निधनावर शोक व्यक्त करताना माजी सभापती श्री. मारुतीराव परमेकर म्हणाले, कै. दीपक दळवी यांनी मुंबई पर्यंत पायी मोर्चाचे नेतृत्व करत सीमा चळवळीला बळकटी आणली. अनेक मेळावे त्यांनी यशस्वी केले, एक कुशल संघटक म्हणून त्यांची ख्याती होती. कर्नाटकाच्या जुलमी राजवटी संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी असो किंवा पोलीस अधिकारी असो यांच्या समोर निर्भीड व परखड शब्दांत सीमाप्रश्न आणि सीमावासींयांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध बाजू मांडून न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न केला, असे निर्भीड व्यक्तीमत्व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. ते आपल्यातून गेल्याने सीमाभागात एका कणखर नेत्याची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी सीमाप्रश्न सुटेपर्यंत आम्ही मराठीवासीय एकजुटीने राहीले पाहिजेत आणि सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असं मत मांडले. याचसोबत माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, दीपक दळवी हे आमचे नेते होते, ते आपल्यातून गेल्याने सीमाभागातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपल्यातून नाहीसे झाले आहे. ते एक उत्तम संघटक आणि समितीशी एकनिष्ठ म्हणून ओळखले गेले. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन आपण सीमाभागातील सर्व कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्न सोडविण्यासाठी एकसंध राहून सीमाप्रश्न सोडवू हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. यावेळी म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य श्री. गोपाळराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, कार्ययाध्यक्ष श्री. निरंजन सरदेसाई, श्री. पांडुरंग सावंत, श्री. रुक्माणा झुंजवाडकर, श्री. अजित पाटील, रमेश धबाले, श्री. मष्णू चोपडे, श्री. नागोजीराव पावले, श्री. शिवाजी पाटील, श्री. मारुती गुरव, खजिनदार श्री. संजय पाटील इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

भीमगड परिसरातील विकासकामांवर प्रशासनाची नजर; विशेष परवानगीशिवाय कामांना बंदी

Spread the love  खानापूर : भीमगड अभयारण्य परिसरातील इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *