Sunday , September 20 2026
Breaking News

गर्भावस्थेत आईचे मानसिक आरोग्य महत्त्वाचे

Spread the love

 

मीनाक्षी रावसाहेब पाटील; बोरगावमध्ये गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन

निपाणी (वार्ता) : गर्भावस्थेत आईचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचार आणि शांत वातावरण गर्भातील बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरते. दीर्घकाळ मोबाईल वापरल्यामुळे मानसिक ताण वाढून झोपेवरही परिणाम होऊ शकतो, असे मत येथील
वीतराग महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केले.
येथील अरिहंत सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा संचलित वीर महिला मंडळ शाखा वितराग महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मोफत सामूहिक गर्भसंस्कार शिबिरप्रसंगी त्या बोलत होत्या.
डॉ. नारायणी खानोलकर यांनी, गर्भवती महिलांना योग्य आहार, मानसिक शांतता, योग व ध्यान साधनेची गरज आहे. जैन धर्मातील अहिंसा, संयम आणि सात्त्विक जीवनशैलीचे संस्कार गर्भातील बाळावर सकारात्मक परिणाम करतात. सात्त्विक आहार, नियमित व्यायाम, योग, ध्यान आणि चांगले साहित्य वाचन केल्याने जन्माला येणारे बाळ सुदृढ व सुसंस्कारी बनत असल्याचे सांगितले. सुवर्णा सौभाग्यवती म्हणून पूजा पाटील, धनश्री पाटील व रोहिणी. हावले यांना मान मिळाला. कार्यक्रमास विनयश्री पाटील, धनश्री पाटील, सुजाता लगारे, वंदना पाटील, सुजाता पाटील, सन्मती पाटील, आशाराणी पाटील, भारती पाटील, सुजाता पाटील, नगरसेविका शोभा हवले, भारती पाटील, सुप्रिया पाटील, उज्ज्वला पाटील यांच्यासह दक्षिण भारत जैन सभा, वीर महिला मंडळ व वितराग महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. तेजस्विनी उपाध्ये यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *