Monday , May 25 2026
Breaking News

बोरगाव नगरपंचायतीचा ६८ हजार ६५२ रुपयांचा शिल्लकी अंदाजपत्रक

Spread the love

 

१२.९९ कोटींचा अर्थसंकल्प रस्ते, पाणी, मूलभूत सुविधांवर भर

निपाणी (वार्ता) : बोरगांव नगरपंचायतीचा सन २०२६-२७ सालाचा अंतिम सुधारित १२.९९ कोटी रुपयांचा आर्थिक अंदाजपत्रक नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आले. यामध्ये ६८ हजार ६५२ रुपये शिल्लकेचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिप, उद्यान, घनकचरा प्रकल्पासह मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. घर फाळ्यामध्ये ५ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
तरतूद कलेल्या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन, प्रिंटिंग, नगरसेवक मानधन, पथदीप बिल, घनकचरा प्रकल्प, पाणीपुरवठा उद्यान निर्मिती व मागासवर्गीय कल्याण निधी असे मिळून एकूण ३ कोटी ४८ लाख ३३ हजार रुपये तसेच पंधरावा वित्त आयोग, एसएफसी अनुदान, वॉटर स्केअर सिटी, एसएससी मुक्त निधी इतर अनुदानातून ८ कोटी ३६ लाख ७६ हजार, विशेष पावतीमधून विविध योजनांसाठी १ कोटी १४ लाख,३६ हजार ३६७ असे एकूण १२ कोटी ९८ लाख ५ हजार रुपयांचा शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आला.
एकूण उत्पन्नातून शासनाकडून कर्मचाऱ्यांना येणारे वेतन, एसएससी मुक्त निधी, व्यापारी गाळ्याचे भाडे, इमारत बांधकाम परवानगी, व्यापार परवाना शुल्क, स्क्रॅप विक्री, पाणी पट्टी व घरफळा, विद्युत अनुदान असे एकूण ३ कोटी ८० लाख १४ हजार रुपये, १५ वा वित्त आयोग, एस एफ सी विशेष अनुदान व इतर उत्पन्नातून ८ कोटी ५ लाख ८० हजार रुपये, विविध वसुली व योजनेतून १ कोटी १४ लाख, ३६ हजार रुपये असे एकूण १२ कोटी, ९९ लाख, १४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी मुख्याधिकारी एस. बी. तोडकर उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक शरद जंगटे, तुळशीदास वसवाडे, माणिक कुंभार, रोहित पाटील, शोभा हावले, रुक्साना अफराज, वर्षा मनगुत्ते, गिरिजा वठारे, संगीता शिंगे, सुवर्णा सोबाने, अश्विनी पवार यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *