Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

प्रदेश काँग्रेसची पुनर्रचना करण्याच्या हालचाली

  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निर्णय बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रदेश काँग्रेसची पुनर्रचना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. केपीसीसीसाठी नवीन कार्याध्यक्षासह नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव नेत्यांनी मांडला आहे. पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या काँग्रेस पक्षाने निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी स्वत:ची रणनीती आखली असून, त्यानुसार केपीसीसीनेही पुनर्रचनेसाठी पावले …

Read More »

आदिशक्तीच्या जागराची तयारी पूर्ण

  निपाणीत भव्य मंडपासह विद्युत रोषणाई ; उद्यापासून सोहळ्यास प्रारंभ निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात नवरात्रो त्सवा निमित्त विविध मंडळातर्फे आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. त्यानिमित्त गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली कामे पूर्ण झाली असून अनेक मंडळांनी भव्य दिव्य असे मंडप उभारले आहेत. रविवारपासून (ता.१४) या सोहळ्याला प्रारंभ होणार असून …

Read More »

शाळा परिसरात तंबाखू, गुटखा विक्रीला प्रतिबंध घालण्याची गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

  निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागातील शाळा परिसरामध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट विक्री केली जात आहे. त्याचा विद्यार्थ्यावर परिणाम होत असून शाळा परिसरातील ही विक्री थांबविण्याचा मागणीचे निवेदन ४ जे आर ह्यूमन राईट केअर ऑर्गनायझेशन संघटनेतर्फे शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्ताकडे दिले होते. त्या तक्रारीची दखल घेऊन येथील गटशिक्षणाधिकारी …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवारी बैठक

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या सोमवारी दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. सदर बैठकीत १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणार्‍या काळ्या दिनाबद्दल विचारविनिमय करण्यासाठी समितीच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

पुलांच्या भरावामुळे गावांत शिरणार पाणी

  नव्या उड्डाणपुलामुळे पाणीसाठा वाढणार निपाणी (वार्ता) : वेदगंगा, दूधगंगा आणि चिकोत्रा या नद्यांना २०१९ पासून दरवर्षी पावसाळ्यात महापूर येत आहे. त्याचाचा फटका नदी काठावरील अनेक गावांना बसत घरांची पडझड, शेती, खासगी मालमत्तेचे नुकसान होण्यासह गावातील नागरिकांना स्थलांतरीत व्हावे लागत आहे. पुलांच्या कडेला टाकलेल्या भरावामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे. …

Read More »

गोमाता संवर्धन काळाची गरज

  प्रफुल्ल भाई; समाधी मठ गो शाळेचे लोकार्पण निपाणी (वार्ता) : पुरातन काळापासून गाईचे महत्व अधोरेखित झाले आहे. कमी होत असलेली देशी गाईंची संख्या चिंतणीय आहे. अशा परिस्थितीमध्ये वीरूपाक्षलिंग समाधी मठात गाई संगोपन उपक्रम स्तुती आहे. देशी गाईपासून मानवी जीवनाला अनेक फायदे असल्यानेआजच्या युगात गोमाता संवर्धन करणे ही काळाची गरज …

Read More »

हालसिद्धनाथ यात्रा २८ ऑक्टोबरपासून

  कुर्ली-आप्पाचीवाडी यात्रा कमिटीतर्फे यात्रोत्सव कार्यक्रम जाहीर निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुर्ली – आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवाची यात्रा (भोंब) २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. २८ पासून १ नोव्हेंबर अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ रोजी सकाळी श्रींची पालखी, सबिना सोहळा, …

Read More »

महिलांनीही रक्तदानासाठी पुढे यावे : उपनिरीक्षिका उमादेवी

  निपाणी (वार्ता) : रक्तदान हे श्रेष्ठदान असून मानवी जीवनाला रक्त शिवाय पर्याय नाही. अलीकडच्या काळात अपघात, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि इतर रुग्णांना रक्ताची टंचाई भासत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था आणि युवक मंडळांनी रक्तदान शिबिरे भरून रक्ताची गरज भागवणे आवश्यक आहे. त्यासाठी निपाणी रोटरी क्लब कार्यरत असून नागरिकांच्या बरोबरच महिलांनीही …

Read More »

शॉर्टसर्किटमुळे आग लागून बोरगाव येथील लाखाचा ऊस जळून खाक

  निपाणी (वार्ता) : लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांमुळे शॉर्टसर्किट होऊन एक एकर ऊस आणि ठिबकचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१३) दुपारी बोरगाव येथे घडली. येथील हुपरी रोडवरील असलेल्या प्रगतीशील शेतकरी जितेंद्र भोजे पाटील यांच्या ऊसाला लागलेल्या आगीत सर्व ऊस जळून खाक झाला. यामध्ये त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. …

Read More »

आयटी छाप्यात ४२ कोटी जप्त

  दुसऱ्या दिवशीही प्राप्तीकरची कारवाई सुरूच बंगळूर : आयकर (आयटी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शहराच्या अनेक भागात छापे टाकले आणि सुमारे ४२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातून विविध राजकीय पक्षांना निधी दिला जात असल्याच्या काही माहितीच्या आधारे काल प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी (आयटी) टाकलेले छापे आजही सुरूच राहिले. …

Read More »