सागर श्रीखंडे : बुदलमुख येथे अभिवादन
निपाणी (वार्ता) : राष्ट्रासाठी सर्वस्वाची होळी करूनही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाट्याला सर्वाधिक उपेक्षाच आली. थोर राष्ट्रभक्त, क्रांतिकारक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक, साहित्यिक, राजकारणी, कवी, इतिहासकार, नाटककार म्हणून त्यांनी केलेले कार्य मोठे आहे. त्यांच्या आचार विचारांची आज देशाला गरज आहे, असे मत हिंदू हेल्प लाईनचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी केले.
बुदलमुख येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू हेल्पलाईनतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची झाली. त्यावेळी श्रीखंडे बोलत होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. श्रीखंडे म्हणाले,सावरकारांनी अस्पृश्यांच्या वस्तीत भजन करणे, सामूहिक भोजन, हळदी कुंकवाचे कार्यक्रम अस्पृश्यांच्या मुलांना शाळेत एकत्र बसवणे असे अनेक उपक्रम राबवले. त्यांनी सुमारे ५०० मंदिरे खुली केली. जातिव्यवस्था उखडून टाकण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाह लावले. त्यासाठी सवर्णांच्या विरोधाला त्यांनी जुमानले नसल्याचे सांगितले.
यावेळी सूरज शिंदे, सतीश मोरे, गुरुनाथ गुरव, सागर गुरव, दिगंबर मोरे, रुशिकेश गुरव, विष्णू चव्हाण, उदय चव्हाण, कुणाल पोटले, कार्तिक शिंदे, कुणाला शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.