उपनिरीक्षिक उमादेवी; शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा केला आहे. आता नवरात्र उत्सव सुरू होणार असून शहर आणि परिसरात ८० पेक्षा अधिक नवरात्रोत्सव मंडळ दुर्गादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. या उत्सवातही नियम व अटी …
Read More »निपाणी द्वितीय दर्जा तहसिलदारपदी अरूण श्रीखंडे यांची नियुक्ती
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील तहसीलदार कार्यालयातील ग्रेड-टू तहसीलदार प्रवीण कारंडे यांची बेंगळूर येथील महसूल मुख्यालयात बदली झाली आहे. त्यांच्या जागी अरुण श्रीखंडे यांची नियुक्ती झाली असून लवकरच ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. कारंडे हे मूळचे निपाणीचे असून त्यांची महसूल भागात २३ वर्षे सेवा झाली आहे. २०१९ मध्ये त्यांनी …
Read More »फटाके बंदीच्या पार्श्वभूमीवर निपाणीत फटाके गोदामांची कसून तपासणी
निपाणी (वार्ता) : बेंगळूरच्या अत्तीबेले येथे फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून मिरवणूक, गणेशोत्सव, विवाह समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी (ता.११) निपाणी मधील फटाके गोदामांची गोदामांची मंडल …
Read More »विद्यार्थ्यांनी बनवली चपाती भाजी!
मॉडर्न इंग्लिश स्कूलचा उपक्रम ; ९० विद्यार्थ्यांचा सहभाग निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात मुलांना शाळेचा डबा तयार करून देण्यासाठी नोकरदार महिलांना वेळ कमी पडत आहे. त्यामुळे हॉटेल व इतर उपहारगृहातून उपहार त्यांना डबे दिले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या …
Read More »निपाणी हद्दवाढीबाबत हस्तांतराची सूचना
सहा गावातील सर्वे क्रमांकाचा समावेश : तालुका पंचायतीला आदेश निपाणी (वार्ता) : निपाणी शहराच्या परिसरातील ग्रामीण भागातील अनेक गावांचा विस्तार वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी नगरपालिकेने सन २०११ साली हद्द वाढीचा प्रस्ताव दिला होता. पण आजतागायत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. अखेर निपाणी तालुका पंचायतीला हद्द वाढीसाठी परिसरातील सहा गावातील …
Read More »कणेरी मठात २६, २७ रोजी मोफत सेंद्रिय शेतीबाबत मेळावा
निपाणी (वार्ता) : श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थान, कणेरी, अंतर्गत श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मार्फत येथे २६ व २७ ऑक्टोबर या दोन दिवशी मोफत सेंद्रिय शेतीबाबत मेळाव्याचे आयोजन केले आहे. या सेंद्रिय शेती मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून सुभाष शर्मा (नैसर्गिक शेती तज्ञ, यवतमाळ), अशोकराव इंगवले (आदर्श खिल्लार गोपालक, …
Read More »निपाणीचा २६ पासून ऊरूस
अध्यक्ष बाळासाहेब सरकार : २७ रोजी मुख्य दिवस निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क.स्व) यांचा उरूस गुरूवार (ता.२६) ते शनिवार (ता.२८) या …
Read More »तब्बल ३५ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
बेनाडी हायस्कूलमध्ये गुरुवंदना : शिक्षकांच्या खाल्ल्या छड्या निपाणी (वार्ता) : ओळखलंस का मला?… सॉरी नाही ओळखलो!..अरे मी…अरे बापरे!, कसा ओळखणार? तू किती बदलायस! अरे तुला भेटून किती बरं वाटलं म्हणून सांगू…’ आणि मग कडकडून मिठी मारण्याचा प्रसंग बेनाडी येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल मध्ये घडला. निमित्त होते, गुरुवंदना मित्रोत्सव कार्यक्रमाचे! …
Read More »दोन टिप्पर-क्रूझर अपघात; ७ ठार
होस्पेट येथील दुर्घटना बंगळूर : दोन टिप्पर आणि क्रुझर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट हद्दीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. भीमलिंगा, केंचव्वा, उमा, भाग्य, गोनीबसप्पा, अनिल आणि युवराज अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सर्व मृत होस्पेट येथील उक्कडकेरी येथील आहेत. टिप्परचा एक्सल कापल्याने …
Read More »शिरगुप्पीत शेतामधील चंदनाच्या झाडाची चोरी
निपाणी (वार्ता) : सयाजीराव गणपतराव देसाई यांच्या शेतामध्ये २५ वर्षापूर्वी लावलेल्या चंदनाच्या झाडाची शिरगुप्पी (ता. निपाणी) येथे चोरी केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सदर शेतकऱ्याने निपाणी शहर पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सयाजीराव यांच्या सर्वे क्रमांक 141/1 मधील शेतात 25 वर्षे जुने चंदनाचे झाड होते. …
Read More »