डॉ. विलोल जोशी; सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास तिकीट
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून शिक्षण घेतले तर ते नक्कीच यशस्वी होतात. आपल्यातील सामर्थ्य ओळखून प्रामाणिकपणे कष्ट केलल्या ध्येय गाठू शकतो.
आयुष्यात उत्तुंग भरारी घेऊन आपले गाव, पालक व शिक्षकांचे नाव उज्वल करावे, असे आवाहन बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यअधिकारी विलोल जोशी यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी दहावी परीक्षेत ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या दलीत समाजातील मुलांच्यासाठी विमान मोफत विमान प्रवासाचा आगळावेगळा उपक्रम राबविला होता. त्याच्या तिकीट वितरण प्रसंगी डॉ. जोशी बोलत होते.
दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या सिद्धी एकनाथ शिंगे व समीक्षा सागर मधाळे या दोन्ही विद्यार्थीनींना तुषार कांबळे व मान्यवरांच्या हस्ते मोफत विमान प्रवासाचे तिकीट वितरण करण्यात आले. तुषार कांबळे यांनी, फक्त जातीने आंबेडकरवादी होण्यापेक्षा विचाराने आंबेडकरवादी झाल्यास त्याचा उपयोग समाजासाठी होत असल्याचे सांगितले.
बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या कोमल कांबळे, समीक्षा नाईक, धनश्री कांबळे, सृष्टी मुरारी या विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन सदलगा येथील संस्थापक अझरुद्दीन शेख, पी. एस. खोत, राजू शिंगे, सुकुमार शिंगे, ए. ए. धुळा सावंत, आदिनाथ हावले, नगरसेविका संगीता शिंगे, अमर शिंगे, इकबाल मुरसल, बशीर मुजावर, दिलिप गोसावी, सुरेश गोसावी, सिद्धार्थ जाधव, शितल कुडचे, अजित कांबळे उपस्थित होते.