Monday , June 17 2024
Breaking News

उडपीत दोन गटात धुमश्चक्री: कारने तरुणाला चिरडले

Spread the love

 

उडपी : कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात कापू भागातील तरुणांच्या दोन टोळक्यांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. उडपी-मणिपाल राष्ट्रीय महामार्गावरील या घटनेचा व्हिडीओ एका इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने शूट केला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. तसेच, गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या तलवारी, सुरे, एक स्विफ्ट कार, दोन दुचाकी आणि इतर शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. ही घटना 18 मेरोजीच्या मध्यरात्री घडली आहे.

या व्हिडीओमध्ये दोन गाड्यांमध्ये आलेल्या काही तरुणांचे दोन टोळके एकमेकांवर हल्ले करत असल्याचे दिसत आहे. आधी त्यांनी एकमेकांवर गाड्या चढवल्याचे दिसत आहे. त्यानंतर काही तरुण गाड्यांमधून उतरले आणि त्यांनी हातातली शस्त्रांनिशी दुसऱ्या टोळीच्या गाडीवर, त्यातील तरुणांवर हल्ले करायला सुरुवात केले. यातील एका पांढऱ्या रंगाच्या कारने तर एका तरुणाला उडवले. यानंतर हा तरुण रस्त्यावर निपचित पडला होता. त्याला दुसऱ्या टोळीच्या काही तरुणांनी उचलून त्यांच्या गाडीत ठेवले. मात्र, त्याआधी विरुद्ध टोळीच्या तरुणांनी निपचित पडलेल्या या तरुणावर हातातील शस्त्रानेही वार केले. महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास घडलेला हा थरार संबंधित प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केला आहे.

भाजपची काँग्रेसवर टीका
या घटनेचा व्हायरल व्हिडिओ कर्नाटक भाजपने त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला असून त्यासोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला लक्ष्य केले आहे. कर्नाटक मॉडेल. गँगवॉर, बलात्कार, हल्ले, हत्या, बॉम्बस्फोट, गांजा, अफू, रेव्ह पार्ट्या, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा हे सगळे कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या काळात सामान्य झाले आहे, अशी टीका भाजपने केली आहे.
दरम्यान, ही घटना आठवड्याभरापूर्वी घडली असून त्याचा व्हिडीओ आत्ता व्हायरल होत असल्याचे उडपी पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून दोन जणांना अटक केली आहे. तर इतर शस्त्र जप्त केली आहेत. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राज्यात ४५ हजार अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीला अनुमती

Spread the love  प्राथमिक ३५ हजार, माध्यमिक १० हजार शिक्षकांची नियुक्ती बंगळूर : शालेय शिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *