खानापूर : लोंढ्याकडून बेळगावकडे येणारी महिंद्रा एक्सयुव्ही कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कार एका दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीस्वारासह कार मधील एकजण असे दोघे जागीच ठार झाले. तर चार जखमी झाल्याची घटना दुपारी तीनच्या दरम्यान खानापूर गणेबैलदरम्यान आयटीआय कॉलेज जवळ घडली. सदर अपघात इतका भीषण होता …
Read More »राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघात जाहीर प्रचाराची सांगता
बंगळूर : या महिन्याच्या २६ तारखेला राज्यातील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या १४ लोकसभा मतदारसंघांसाठीच्या जाहीर प्रचाराची काल सायंकाळी सांगता झाली. मतदान संपण्याच्या ४८ तास जाहीर प्रचाराची मोहीम संपली, त्यानुसार आज संध्याकाळी १४ लोकसभा मतदारसंघातील खुल्या प्रचाराची सांगता झाली. जाहीर प्रचाराचा समारोप लक्षात घेऊन मतदारसंघातील मतदार नसलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना व …
Read More »उमेदवार शंभू कल्लोळकर यांनी घेतली ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची भेट
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शंभू कल्लोळकर यांनी रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या निपाणी येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विषयावर चर्चा झाली. प्रारंभी शंभू कल्लोळकर यांचा राजू पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कल्लोळकर म्हणाले, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात प्रत्येक वेळच्या निवडणुकीत …
Read More »गॅरंटी योजनेमुळे काँग्रेस विजय होणार
माजी आमदार काकासाहेब पाटील; काँग्रेस कार्यालयात बैठक निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मतदारांना अनेक योजनांची गॅरंटी दिली होती. सरकार सत्तेवर येताच त्याची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये महिलासह सर्व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. बुधवारी (ता. २४) सायंकाळी …
Read More »पहिल्या टप्यातील निवडणुकीची तयारी पूर्ण
मनोज कुमार मीना; मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था बंगळूर : निवडणूक आयोगाने कर्नाटक राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या मतदानाची अंतिम तयारी पूर्ण केली आहे. मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, यावेळी राज्यात १,८३२ विशेष मतदान केंद्रांच्या स्थापनेकडे लक्ष वेधले आहे, अशी …
Read More »‘अरिहंत’च्या १२०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण
संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील; गोव्यातही शाखा विस्तारणार निपाणी (वार्ता) : नफा मिळविण्याचा उद्दिष्ट बाजूला ठेवून सर्वसामान्य शेतकरी, उद्योजकांना मदत करण्याच्या दृष्टीने अरिहंत संस्थेची स्थापना केली आहे. ठेवीदार, कर्जदार यांच्या सहकार्यामुळे अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेत चालू आर्थिक वर्षात १२०२ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. गतवर्षी संस्थेने ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण …
Read More »मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी युवकांनी समितीच्या पाठीशी उभे रहावे : निरंजन सरदेसाई
खानापूर : राष्ट्रीय पक्ष लोकांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र यापासून दूर राहात मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी युवकांनी समितीच्या पाठीशी उभे राहुन आपली अस्मिता दाखवावी असे प्रतिपादन कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी केले आहे. समिती उमेदवाराच्या …
Read More »कार्यकर्त्यांच्या साथीमुळे काँग्रेसची ताकद वाढली
पालकमंत्री सतीश जारकीहोळी; राज पठाण यांची घरवापसी निपाणी (वार्ता) : माजी नगरसेवक राज पठाण, शेरगुलखान पठाण यांच्यासह बेफारी समाज, सहारा स्पोटर्स, नागराज युवक मंडळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा कॉंग्रेस मध्ये प्रवेश करून पक्षाला साथ दिले आहे. त्यामुळे काँग्रेसपक्षाची ताकद वाढली आहे. त्यांच्या या ताकदीने काँग्रेसचा विजय निश्चीत आहे, असे मत …
Read More »समितीच्या उमेदवारांनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट!
बेळगाव : बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी मंगळवारी कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. लोकसभेच्या उमेदवारांसह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यानी बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघातील परिस्थितीची माहिती दिली तसेच समितीने निवडणूक लढविण्याचा निर्णय …
Read More »जिल्ह्याच्या विकासासाठी विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचे योगदान काय; डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा सवाल
खानापूर : सत्तेत असताना जिल्ह्यासाठी आवश्यक अश्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारणीसाठी हेगडे कागेरी यांनी अधिवेशनात एकदाही प्रश्न उपस्थित केला नाही. वर्षानुवर्ष स्वतःकडे मंत्री पद असून देखील स्वतःच्या मतदारसंघाचा विकास ज्यांना करता आला नाही ते आता विकासाची भाषा बोलत आहेत. सहा वेळा आमदार, अनेक वर्षे मंत्रीपद, विधानसभेचे अध्यक्ष अशी महत्त्वपूर्ण पदे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta