Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

गरजेच्या ठिकाणी अंधार, नको तिथे पथदिपाचा उजेड

  निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, वरदविनायकनगर कमलनगर येथील नागरी वस्तीमध्ये गेल्या दोन वर्षापासून पथदीप व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या उच्चभ्रू परिसरातील नागरिकांना रात्रीच्यावेळी चाचपडत ये -जा करावी लागत आहे. तर आवश्यक नसलेल्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून पथदीप बसविले आहेत. नगरपालिकेच्या या कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत …

Read More »

अंजली निंबाळकर यांनी घेतला उत्तराखंडमधील काँग्रेसच्या संघटनात्मक कामाचा आढावा

  खानापूर : माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नवी दिल्लीतील काँग्रेसच्या इंदिरा भवन कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभाग नोंदवला. यावरी डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांच्या अखत्यारीतील उत्तराखंड राज्याच्या ‘संघटन सृजन अभियान’ या उपक्रमाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. या आढाव्यात त्यांनी आपल्या कामाचा …

Read More »

राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांनी दिल्या सूचना

  खानापूर : राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी खानापुरात राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना तसेच युवा निधी या सर्व योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारकडून शक्य …

Read More »

श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग, तोपिनकट्टीत खो खो, कबड्डी स्पर्धेचे 18 ऑक्टोबर रोजी आयोजन

  खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे खास दिवाळीच्या सणानिमित्त श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग यांच्यावतीने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खो खो स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत. विजयी संघांना पहिले बक्षीस रुपये. 21001, व ट्रॉफी,दुसरे …

Read More »

दसऱ्याच्या वाढीव सुट्टीमुळे निपाणी परिसरात गड, किल्ले तयार करण्यात बालचमू व्यस्त

  निपाणी (वार्ता) : यावर्षी शिक्षण खात्याने दसऱ्याची वाढीव सुट्टी दिल्याने निपाणी शहराच्या ग्रामीण भागातील रिकामे असलेले बालचमू चार-पाच दिवसांपासून गड-किल्ले साकारण्यात गुंतले होते. अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या असून सध्या त्यावर सैनिक ठेवण्यासह विद्युत रोषणाई केली जात आहे. शहरासह उपनगरांतील किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या आहेत. यंदा ३४ पेक्षा …

Read More »

डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘राजा शिवाजी’ संघ केएसपीएलमध्ये बेळगावचे नेतृत्व करणार

  खानापूर : कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट लीग केएसपीएल-२ स्पर्धेत ‘राजा शिवाजी’ हा संघ बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, ती आयपीएलच्या धर्तीवर आयोजित केली जाणार आहे. ​माजी आमदार व कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट असोसिएशनच्या (एआयसीसी) सचिव डॉ. अंजली निंबाळकर या राजा शिवाजी संघाच्या मुख्य …

Read More »

भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थान, कार्यालयावर लोकायुक्तांचे छापे

  मोठ्या प्रमाणात अनधिकृत संपत्तीचा शोध बंगळूर : राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांचे छापे सुरूच आहेत. आज पहाटे राज्यभरात १२ ठिकाणी लोकायुक्तांनी छापे टाकले. लोकायुक्तांनी हसन, गुलबर्गा, चित्रदुर्ग, उडुपी, दावणगेरे, हावेरी, बागलकोट आणि बंगळुर शहरात छापे टाकून तपासणी केली. बंगळुरमध्ये तीन ठिकाणी लोकायुक्तांनी छापे टाकले आहेत. वैद्यकीय अधिकारी- मंजुनाथ, जी. व्ही. …

Read More »

गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तावडेंसह 3 आरोपींना जामीन मंजूर

  कोल्हापूर : कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कडून जामीन मंजूर झालाय. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज पर्यंत एकूण 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 9 जणांना यापूर्वीच …

Read More »

हत्तरवाड येथील शेतकऱ्याला सर्पदंशाने मृत्यू

  बेळगाव : खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथील एका शेतकऱ्याला सर्पदंश झाल्याने इस्पितळात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून गणपती नारायण हलसकर (वय 52) असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपती हलसकर हे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी, आपल्या शेतामध्ये काम करत असताना विषारी सर्पाने …

Read More »

खानापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री फोडली तब्बल 9 घरे

  खानापूर : खानापूर तालुक्यातील शिंपेवाडी, गुंजी आणि सावरगाळी या तीन गावांतील तब्बल नऊ घरे चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री फोडली आहेत. या चोरट्यांनी सावरगाळीतील एका घरातून तब्बल पंधरा लाख रुपये रोख रक्कम, 16 तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीचे दागिने लंपास केले आहेत. सोमवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या असून …

Read More »