खानापूर : मराठा मंडळ पदवी कॉलेजजवळ असलेल्या खानापूर-बेळगाव महामार्गावरील पुलाखाली असलेल्या संपर्क रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुभाजकला दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हलकर्णी गावातील निखिल नागेंद्र उर्फ नागो गुंजीकर (वय 22) हा दुचाकीस्वार युवक बेळगावहून खानापूरकडे येत असताना रात्री …
Read More »येत्या ७२ तासांत मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा
बंगळुरू : यंदा पावसाने भीषण पूरस्थिती निर्माण केली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी हवामान खात्याने पुढील ७२ तास ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाळा संपायला अजून २ महिने बाकी आहेत. म्हणजेच सप्टेंबर २०२४ पर्यंत मान्सून पाऊस पडेल. असे असले तरी अवघ्या २ महिन्यात पावसाच्या …
Read More »मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याविरोधात भाजप सुडाचे राजकारण करत आहे : मंत्री दिनेश गुंडूराव
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात बंड पुकारल्याने भाजप सरकार सिद्धरामय्यांच्या विरोधात सूडाचे राजकारण करत आहे. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला असून यामुळे सिध्दरामय्यांचे केंद्रासमोर आव्हान उभे आहे, अशी टीका आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी केली. आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिनेश गुंडूराव पुढे …
Read More »भाजप-धजद पदयात्रेला परवानगी : जी परमेश्वर
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा बंगळूर : मुख्यत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात गाजत असलेल्या मुडा घोटाळ्याशी संबंधित लढा अधिक तीव्र करण्यासाठी विरोधी पक्ष भाजप आणि धजद आज (ता. ३) बंगळूर-म्हैसूर पदयात्रेला सुरवात करणार आहेत. दरम्यान, पदयात्रेला सरकारने परवानगी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी शुक्रवारी सांगितले. आज बंगळुरमध्ये …
Read More »मुडा घोटाळा : सरकार विरुध्द राजभवन संघर्ष पेटण्याची शक्यता
नोटीसला घाबरत नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा बंगळूर : राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुडा घोटाळा प्रकरणी नोटीस बजावली असून उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील काँग्रेस सरकार आणि राजभवन यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही राज्यपालांच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिल्याने आगामी काळात हा प्रकार …
Read More »तहसीलदाराकडून गैरहजर अधिकाऱ्यांची कान उघाडणी
पूरग्रस्त छावणीला रात्रीची भेट; जाणून घेतल्या समस्या निपाणी (वार्ता) : निपाणीचे ग्रेड- १ तहसीलदारपदी प्रवीण कारंडे यांची गुरुवारी नियुक्ती झाली. सकाळी पदभर स्वीकारताच त्यांनी प्रशासकीय कामाला प्रारंभ करून मानकापूर येथील पाटील मळ्यातील पूरग्रस्त छावणीला रात्रीची भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर गैरहजर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. …
Read More »मटण खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
रायचूर : रायचूर जिल्ह्यातील सिरावर तालुक्यातील कल्लूर गावात मटण खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. भीमन्ना (60), इरम्मा (54), मल्लेश (19) आणि पार्वती (17) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मल्लम्माची प्रकृती चिंताजनक असून तिला रायचूर येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मटण शिजवताना सरडा पडल्याचा संशय …
Read More »पीएचडी पदवी मिळविल्याबद्दल डॉ. समिरा चाऊस यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील विद्या संवर्धक मंडळ संचलित सी. बी. एस. ई. इंग्रजी शाळेतील प्राचार्या डॉ. समीरा फिरोज चाऊस यांनी पीएचडी पदवी मिळविली आहे. संस्थेतर्फे त्यांचा सीईओ डॉ. सिदगौडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. समिरा चाऊस यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात ‘ए स्टडी ऑन युटीलायझेशन …
Read More »संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना निपाणीतून पाठिंबा
निपाणी (वार्ता) : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या भविष्यातील सर्व लढ्यांना निपाणी भाग मराठा समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला. यावेळी मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुतळ्याचे …
Read More »गळतगा, मानकापूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती
निपाणी (वार्ता) : गळतगा आणि मानकापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गळतगा येथील ग्राम पंचायत कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार- वड्डर, ग्रामपंचायत अध्यक्ष राजु पाटील, उपाध्यक्ष लखव्वा हुनसे, …
Read More »