Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटक

पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस : सर्वत्र अलर्ट जाहीर?

  बेंगळुरू : येत्या तीन दिवस राज्याच्या किनारपट्टी, डोंगराळ प्रदेश आणि उत्तरेकडील भागात मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या तीन दिवसांत किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असून उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड आणि उडुपीमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. शिमोग्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. …

Read More »

राज्यपालांच्या नोटीसला मंत्रिमंडळ बैठकीत आक्षेप; नोटीस मागे घेण्याचा ठराव

  बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) बेकायदेशीर जमीन वाटप घोटाळ्याबाबत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिलेल्या नोटीसला गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र आक्षेप घेण्यात आला. आज मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुडा घोटाळ्याबाबत राज्यपालांनी बजावलेली नोटीस मागे घेण्याची मागणी करण्याचा निर्णय …

Read More »

मंत्रिमंडळातीस सर्व सदस्य मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी खंबीर

  कावेरी निवासस्थानी अल्पोपहार बैठक बंगळूर : मुडा घोटाळाप्रकरणी अडचणीत असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी एकमताने घेतला आहे. मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवायला हवा, असे सामाजिक कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांनी राज्यपालांकडे सादर केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ उभे …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

  बेळगाव : बदली करुन घेतलेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक किंवा अतिथी शिक्षकांची नेमणूक केल्याशिवाय शिक्षकांना बदली झालेल्या ठिकाणी सोडू नये तसेच खानापूर तालुक्यातील मराठी शाळांचा पदभार मराठी विषयांच्या शिक्षकांकडे देण्यात यावा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांच्याकडे करण्यात आली आहे. खानापूर तालुका समितीचे …

Read More »

कर्नाटक राज्यातील राजकीय घडामोडीवरून कॉंग्रेस हायकमांडने दिली समज

  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी दिल्लीत चर्चा बंगळूर : कर्नाटकमधील अलीकडच्या राजकीय घडामोडींबद्दल काँग्रेसच्या हायकमांडने मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर ताशेरे ओढले व समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील मुडा प्रकरण, वाल्मिकी घोटाळा आदी घटनामुळे काँग्रेस पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी नवी दिल्लीत …

Read More »

खानापूर तालुक्यातील सरकारी शाळेच्या शाळा सुधारणा कमिटीची बैठक रविवारी

  खानापूर : सर्व सरकारी शाळा वाचविणे अभियानच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सर्व मराठी, कन्नड तसेच उर्दु सरकारी शाळेच्या शाळा सुधारणा कमिटीची बैठक रविवारी बोलावण्यात आली आहे. सरकारी शाळेच्या पटसंख्येत होणारी घट तसेच अतिथी शिक्षक नियुक्ती तसेच विविध अडचणीवर होणार चर्चा असून या बैठकीत सर्व शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष तसेच शिक्षण …

Read More »

पुराचा पहिला बळी; कृष्णा नदीतून वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला!

  चिक्कोडी : तालुक्यातील पहिला बळी कृष्णा नदी ओसंडून वाहत आहे. याच दरम्यान २९ जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची येथील एक शेतकरी कृष्णा नदीत वाहून गेल्याची माहिती मिळाली होती आज वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. संतोष सिद्धप्पा मैत्री (41) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी …

Read More »

आठवडाभरात मिळणार दोन महिन्याचे वेतन

  उत्तम पाटील यांची अधिकाऱ्यांशी चर्चा; कर्मचाऱ्यांचा संप मागे निपाणी (वार्ता) : शहरात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या पाणीपुरवठा तू भागातील ५० कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यांपासून थकीत आहे. याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही वेतन न मिळाल्याने सोमवारी (ता.२९) कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. परिणामी दिवसभर पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे सहकाररत्न उत्तम पाटील यांनी प्रांताधिकारी …

Read More »

हालात्री नदी पुलावरून वाहून जाणारा बचावला!

  खानापूर : गोव्याहून हेमाडगा मार्गे खानापूरकडे आपल्या दुचाकीवरून येत असताना बेळगाव शहापूर येथील व्यक्ती विनायक जाधव या व्यक्तीने मणतूर्गा जवळील हालात्री नदीवरील पुलावर दुचाकी घातल्याने दुचाकीसह वाहून जात असताना नदीकाठावरील झुडुपातील फांदी पकडून धरली आणि आरडाओरडा करू लागला. याबाबतची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता खानापूर येथील अग्निशामक दलाची गाडी व …

Read More »

देवराई गावाजवळ शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील देवराई गावाजवळ सोमवारी सायंकाळी गुरे चारून घरी परतणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. अस्वलाने गावातील शेतकरी नारायण चौरी (65) यांच्यावर मागून हल्ला केला. त्यांच्या पाठीला व डोक्याला दुखापत केली. ही घटना नागरगाळी वनपरिक्षेत्रातील देवराई गावाजवळ घडली, नारायण यांच्या ओरडण्याच्या आवाजाने …

Read More »