Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

सोयाबीन काढणीला आता “नाईंटी हवी”….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरात सोयाबीन काढणी मळणीच्या कामाची धांदल उडालेली दिसत आहे. एकाच वेळी सर्वत्र सोयाबीन काढणी मळणीचे काम सुरू झाल्याने शेतमजूरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. शेतमालकांना सोयाबीन काढणी मळणीसाठी शेतमजुरांची मनधरणी करावी लागत आहे. शेतमजूरांच्या मागण्या वाढल्याने शेतकरी, शेतमालक डोक्याला हात लावून बसलेले दिसत आहेत. शेतमजूर सांगताहेत …

Read More »

कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाची सोमवारी निपाणीत सभा

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य नोकर संघ निपाणी तालुक्याची सभा सोमवारी (ता.१०) सायंकाळी चार वाजता येथील बस स्थानकाजवळील आशीर्वाद मंगल कार्यालय मध्ये होणार आहे. यावेळी राज्याध्यक्ष व मान्यवरांचा सत्कार होणार आहे. राज्याध्यक्ष यांचा सत्कार होणार आहे. यावेळी सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य नोकर संघटनेतर्फे करण्यात आले आहे. यावेळी …

Read More »

वाल्मिकी समाज भवनासाठी दहा लाखाचा निधी

  मंत्री शशिकला जोल्ले : निपाणीत वाल्मिकी कोळी जयंती निपाणी (वार्ता) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबधित राज्यांना कोळी समाजाच्या आरक्षणाबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकातील कोळी समाजाचे आरक्षण ३ टक्के वरून ७ टक्के केले आहे. ७५ वर्षात जे प्रश्न सुटले नाहीत ते प्रश्न भाजप …

Read More »

बोरगाव परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य

  रस्ता कामाची चौकशी करा : माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार- वडर निपाणी (वार्ता) : बोरगाव -बेडकीहाळ, बोरगाव -आयको या आंतरराज्य मार्गांची गेल्या अनेक महिन्यापासून दुरावस्था झाली आहे. दोन्ही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांची स्थिती एवढी मोठी आहे की त्यांना खड्डे म्हणावे की रस्ताच नाही, अशी …

Read More »

पालकांनी मुलांना प्रोत्साहन देणे आवश्यक

सुधाकर सोनाळकर : दौलतराव पाटील फाउंडेशनतर्फे सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : सर्वच मुलांमध्ये कोणते ना कोणते सुप्त गुण असतात. शालेय पातळीवर या गुणांची वाढ होत असताना शिक्षकाकडून त्यांना मार्गदर्शन मिळते. त्यामुळे अनेक मुले विविध खेळासह अभ्यासात पुढे जातात. त्यासाठी आता पालकांनीही आपल्या मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत सुधाकर …

Read More »

संकेश्वरात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना दंड…..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर जुन्या पुणे-बेंगळूर महामार्गावरील शिवशक्ती जनरल स्टोअर्सने घनकचरा रस्त्यावर फेकून दिल्याने आज पालिकेने दंडात्मक कारवाई केलेली दिसत आहे. शिवशक्ती दुकान मालकाने कचरा रस्त्यावर फेकून दिल्याचे दिसून येताच आज पालिका सॅनेटरी सुपरवायझर श्रीधर बेळवी, मुकादम सुनिल पाटील, परशराम सत्यनाईक, कृष्णा खातेदार यांनी दुकान मालक वागाराम माळी …

Read More »

संकेश्वरात श्री बसवेश्वर यात्रोत्सव….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बसवाण गल्लीतील श्री बसवेश्वर देवस्थानची यात्रा विविध कार्यक्रमांनी, भक्तीमय वातावरणात पार पडली. गेले अकरा दिवस झाले मंदिरात अहोरात्र टाळ वाजवून शिवाची आराधना करण्यात आली. आज निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. श्रींनी देवाची पूजा करुन आपल्या प्रवचनात बसवेश्वरांची महती …

Read More »

नंदगडात भाजपतर्फे महिला मेळावा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील मार्केटिंग सोसायटीच्या सभामंडपात खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नंदगड गावातील माता-भगिनींचा महिला मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बेळगाव भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कार्यदर्शी सौ. कमलाक्षी होशेट्टी होत्या. कार्यक्रमाला प्रमुखातिथी म्हणून खानापूर तालुक्याचे माजी आमदार भाजपा नेते अरविंदराव पाटील, खानापूर तालुका …

Read More »

एससी, एसटी आरक्षण वाढीसाठी आदेश जारी करणार

  मंत्रिमंडळाचे अनुमोदन; एससी १७ टक्के, एसटी ७ टक्के आरक्षण बंगळूर : कर्नाटक मंत्रिमंडळाने शनिवारी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी, एसटी) साठी आरक्षण वाढविण्याचा कार्यकारी आदेश जारी करण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर सरकार संविधानाच्या ९ व्या अनुसूची अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी पावले उचलेल. आरक्षण अनुसूचित जातींसाठी १५ टक्क्यांवरून १७ टक्के आणि …

Read More »

कानसीनकोपात व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

  खानापूर (प्रतिनिधी) : कानसीनकोपात (ता. खानापूर) खुल्या व्हॉलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी दि. ८ रोजी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवणा गंदिगवाड होते. तर सिध्दरामया स्वामीजी यांच्या सानिध्यात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, शितल बंबाडी, हणमंत पाटील, बसवराज निंबाळकर, यशवंत कोडोली, …

Read More »