Friday , April 17 2026
Breaking News

नंदगडात भाजपतर्फे महिला मेळावा संपन्न

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील मार्केटिंग सोसायटीच्या सभामंडपात खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नंदगड गावातील माता-भगिनींचा महिला मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बेळगाव भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कार्यदर्शी सौ. कमलाक्षी होशेट्टी होत्या. कार्यक्रमाला प्रमुखातिथी म्हणून खानापूर तालुक्याचे माजी आमदार भाजपा नेते अरविंदराव पाटील, खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय कुबल, भारतीय जनता पार्टीचे नेते विठ्ठलराव हलगेकर, भारतीय जनता पार्टी बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद कोचेरी, माजी तालुका भाजपा अध्यक्ष विठ्ठलराव पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमानी, तालुका प्रधान कार्यदर्शी बसवराज सानिकोप, गुंडू तोपिनकट्टी, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक चलवादी, माजी सभापती सयाजी पाटील, माजी प्रधान कार्यादर्शी मारुती पाटील, भाजप नेते बाबासाहेब देसाई भाजप नेते अजित पाटील, महादेव गावकर, महाबळेश्वर चवलगी, श्री. मारुती टक्केकर, रवी बनोशी, श्री. दर्शन खिलारी, संतोष हडपद, श्री. शंकर बसवाडकर, वासुदेव नांदुरकर, प्रकाश गुरव, श्री. सुरेश मागेरी, नंदगड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदार तसेच इतर भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका पंचायतचे माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *