Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वरात श्री बसवेश्वर यात्रोत्सव….

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बसवाण गल्लीतील श्री बसवेश्वर देवस्थानची यात्रा विविध कार्यक्रमांनी, भक्तीमय वातावरणात पार पडली. गेले अकरा दिवस झाले मंदिरात अहोरात्र टाळ वाजवून शिवाची आराधना करण्यात आली. आज निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. श्रींनी देवाची पूजा करुन आपल्या प्रवचनात बसवेश्वरांची महती सांगितली. श्रींच्या हस्ते शतायुषी सिध्दापण्णा बेविनकट्टी यांचा सत्कार करण्यात आला. श्रींच्या हस्ते प्रसाद पूजन झालेनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. याचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला. यावेळी संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, बसवराज बागलकोटी, नगरसेवक संजय शिरकोळी, रोहण नेसरी, संतोष मगदूम, आनंद शिरकोळी अनेक मान्यवर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत बसवराज कडेमनी यांनी केले. आभार ध्वनी गिरीश गड्डी हिने मानले. संकेश्वर होसपेटी बसवेश्वर युवक मंडळातर्फे गेले अकरा दिवस मुले-मुली आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी गावातील प्रमुख मार्गे श्री बसवेश्वर देवाचा पालखी सोहळा काढण्यात आला. मंदिरात रात्री मुगळी येथील श्री बसवेश्वर भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. यात्रोत्सवाचे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होसपेटी बसवेश्वर युवक मंडळाचे अध्यक्ष विजय जरळी, निखिल शिरकोळी, किरण शिरगांवी, सुहास तौकरी, उमेश फडी, ओंकार गड्डी आणि मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *