संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. सचिन पाटील यांच्या विहिरीत आढळून आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. त्याचे नाव बसवराज शंकर कुराडे (वय ३८) राहणार बेळगांव असे असून तो निपाणी येथील एका बारमध्ये कामाला असल्याचे सांगितले जात आहे. संकेश्वर पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, …
Read More »सीमाप्रश्नी बाजू मांडण्यासाठी कर्नाटक करणार तज्ञांची नियुक्ती : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती
बंगळूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर २३ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्याच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी अनुभवी आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक टीम नियुक्त केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सीमावादावर ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना आवश्यक सल्ला देण्यात आला आहे. …
Read More »संतसमाज कुप्पटगिरीतर्फे श्रीगणेश चतुर्थी प्रीत्यर्थ विशेष संत समागम संपन्न
खानापूर : आध्यात्मिक धर्मगुरु, पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्रीक्षेत्र तपोभूमी – गोवा संचालित संत समाज – कुपटगिरी आयोजित श्रीगणेश चतुर्थी प्रीत्यर्थ विशेष संत समागमाचे आयोजन कल्लाप्पा पाटील यांच्या गृहस्थाश्रमी सोमनाथ पाटील यांच्या यजमान पदाखाली सुसंपन्न झाले. मंगलमूर्ती श्री गणरायाचं आगमन आपापल्या गृहस्थाश्रमामध्ये …
Read More »खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांना यंदाचा जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर
खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही पाच सप्टेंबर रोजी बेळगाव येथील कुमार गंधर्व येथे होणाऱ्या शिक्षक दिन कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना यंदाचा जिल्हा आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्काराचे मानकरी निडगल मराठी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ कुंभार, आंबोळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार, शिरोली मराठी शाळेचे …
Read More »खानापूर सिव्हिल हॉस्पिटल समोरील वाहने अन्यत्र लावावीत
खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल समोर छोटाहत्ती रिक्षा लावतात. हॉस्पिटलला जाताना रुग्णांना अडचण होते. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी छोटाहत्ती रिक्षा लावतात ते बाजूला करून लावण्याची व्यवस्था करावी आणि दोन दिवसापूर्वी छोटाहत्ती KA22D2817 हा रिक्षावाला हॉस्पिटलला आलेल्या कार चालकाला दादागिरीची भाषा बोलत होता. इथं आमचे रिक्षा स्टॅन्ड आणि …
Read More »मेरड्यात कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
खानापूर (प्रतिनिधी) : मेरडा (ता. खानापूर) येथील जनसेवक क्रीडा संघाच्या वतीने आयोजित पुरूष महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक के. के. पाटील होते. तर व्यासपीठावर गोव्याचे डीएसपी सी. एल. पाटील, ग्राम पंचायत सदस्य पांडुरंग पाटील, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा …
Read More »कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला निपाणी, अकोळ येथे पूर्वनियोजित बैठका
निपाणी (वार्ता) : येथे बुधवारी (ता.७) होणारा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा हा २०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून माजी आमदार काकासाहेब पाटील ह्यांनाच उमेदवार करून ही निवडणूक जिंकण्यासाठी निपाणी येथील प्रमुख कार्यकर्त्याची मते जाणून घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी भाग …
Read More »खानापूरात पोषण महासप्ताह कार्यक्रम संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील चिरमुरे गल्लीतील मराठी शाळेत बाल कल्याण खाते, ओराग्य खाते, शिक्षण खाते व कायदा सुव्यवस्था याच्या सयुक्त विद्यामाने पोषण महासप्ताह नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीडीपीओ राममुर्ती के. व्ही. होते. तर व्यासपीठावर दिवानी न्यायाधीश सूर्यनारायण, ऍडिशनल दिवानी न्यायाधीश विदेश हिरेमठ, एम. वाय. कदम सेक्रेटरी बार असोसिएशन …
Read More »सीईटी रिपीटर्स वाद; सीईटीची गुणवत्ता यादी नव्याने करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
बारावी, सीईटीचे ५०:५० प्रमाणात गुण; रिपीटर्स विद्यार्थ्यांनाही मिळाला न्याय बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने शनिवारी राज्य सरकार आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरण (केईए) यांना बारावी (द्वितीय पीयुसी) गुण आणि सीईटी २०२२ गुण ५०:५० च्या प्रमाणात घेऊन सीईटी – २०२२ ची गुणवत्ता यादी (रँकिंग) पुन्हा करण्याचे निर्देश दिले. २०२१ मध्ये उत्तीर्ण झालेल्या …
Read More »गौराई आली सोनपावलांनी
निपाणी परिसरात स्वागत : महिलांनी साधला दुपारचा मुहूर्त निपाणी (वार्ता) : विघ्नहर्त्या गणरायाची स्थापना झाल्यानंतर गौरीची स्थापना केली जाते. त्यामुळे दोन दिवसांपासून स्वागताची तयारी केली होती. शनिवारी (ता. ३) दिवसभर गौरीच्या आवाहनासाठी नदी, तलाव, जलकुंभ आणि विहिरीवर महिलांची लगबग दिसून आली. सणाच्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारपेठेत विविध प्रकारचे गौरीचे मुखवटे उपलब्ध केले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta