Monday , September 21 2026
Breaking News

खानापूरात पोषण महासप्ताह कार्यक्रम संपन्न

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील चिरमुरे गल्लीतील मराठी शाळेत बाल कल्याण खाते, ओराग्य खाते, शिक्षण खाते व कायदा सुव्यवस्था याच्या सयुक्त विद्यामाने पोषण महासप्ताह नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीडीपीओ राममुर्ती के. व्ही. होते.
तर व्यासपीठावर दिवानी न्यायाधीश सूर्यनारायण, ऍडिशनल दिवानी न्यायाधीश विदेश हिरेमठ, एम. वाय. कदम सेक्रेटरी बार असोसिएशन खानापूर, बीईओ राजेश्वरी कुडची, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सीडीपीओ राममुर्ती के. व्ही. यांनी केले.
यावेळी बोलताना सीडीपीओ राममुर्ती के. व्ही. म्हणाले की, या सप्टेंबर महिन्यात चार आठवडे पोषण महासप्ताह साजरा करण्यात येणार असून यामध्ये मातृ वंदना, सुकन्या समृद्धी योजना, पोषण योजना, आदी योजनेचे फायदे तोटे नागरीकापर्यत पोहचवून त्याचा लाभ त्याना देण्यात येणार आहे. यावेळी दिवानी न्यायाधीश सूर्यनारायण यांनी सरकारच्या सवलतीचा लाभ प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका, सहाय्यिका, अशा कार्यकर्त्या तसेच विविध खात्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *