Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांना यंदाचा जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही पाच सप्टेंबर रोजी बेळगाव येथील कुमार गंधर्व येथे होणाऱ्या शिक्षक दिन कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना यंदाचा जिल्हा आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे मानकरी निडगल मराठी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ कुंभार, आंबोळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार, शिरोली मराठी शाळेचे शिक्षक शिवाजी गावडे, नेरसेवाडी मराठी शाळेचे शिक्षक गोपाळ पाटील तसेच शिवाजीनगर खानापूर मराठी शाळेचे कन्नड शिक्षक बी. व्ही. गडाद, तर कक्केरी कन्नड शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. केळीकेतर आदीना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त बेळगाव येथील कुमार गंधर्व सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. त्याबद्दल खानापूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातुन तसेच जनतेतून अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *