Tuesday , December 16 2025
Breaking News

कर्नाटक

४८ तासातील दुसऱ्या हत्येनंतर मंगळूरमध्ये तणाव

प्रतिबंधात्मक आदेश, तणावपूर्ण परिस्थितीत दफन बंगळूर : गुरूवारी (ता. २८) रात्री सुरतकल येथे हत्या झालेल्या मोहम्मद फाजिल (वय २३) च्या हल्लेखोरांची ओळख पटवून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांचे सतत प्रयत्न सुरू असतानाच, त्याच्या पार्थिवावर मंगलपेठे येथे जवळच्या मशिदीत धार्मिक विधींसह अंतसंस्कार करण्यात आले. गुरूवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी सुरतकल येथे त्याची …

Read More »

संकेश्वरात उन्ह पाऊस अन् विजांचा गडगडाट…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नागरिकांना आज विचित्र हवामानाचा अनुभव घेता आला. सकाळी पावसाच्या तुरळक सरी, दुपारी उन्हाच्या काहिलीने लोकांना परेशान केले अन् सायंकाळी विजांच्या कडकडाटातसह तुरळक पाऊस बरसला. आजच्या विचित्र हवामानाची लोकांत चांगलीच चर्चा केली जात आहे. तरण्या पावसानंतर पुष्य नक्षत्र काळात बरसणाऱ्या म्हातारा पावसाची एंट्री संथगतीने झालेली दिसत …

Read More »

निपाणी तालुक्यात शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त

  निपाणी : गेले 8 दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी सोयाबीन भुईमूग, मक्का पेरणी केलेल्या शेतामध्ये बैलजोडीच्या सहाय्याने कोळपी मारण्याच्या कामात व्यस्त असताना दिसत आहेत. तर कांही ठिकाणी हाताने ओढून कोळपी मारण्याचे काम करीत आहेत, कोळपी मारून झालेल्या वावरामध्ये लागलीच पाठीमागुन खुरप्याने भांगलन करून शेतीशिवारे स्वच्छ ठेऊन पिके जोमाने डोलताना …

Read More »

डेप्युटेशनवर असलेल्या डॉक्टरांना त्वरित ड्युटीवर हजर करा

आपचे तहसीलदारांना निवेदन; इतर खात्यातीलही असे प्रकार होणे नाही ही विनंती खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर, नंडगड आणि पारीश्वाड येथिल सरकारी रुग्णालयातील पाच डॉक्टर गेल्या बऱ्याच महिन्यापासून डेप्युटेशनवर आहेत, डॉक्टरांची कमतरता असून देखील नियमबाह्य पद्धतीनं ते गैरहजर आहेत त्यांना त्वरित सेवेत हजर होण्यासाठी नोटीस द्यावे, अशा मागणीचे निवेदन आपच्या वतीने …

Read More »

संकेश्वर स्विमिंग ग्रुपतर्फे शिवअष्टोत्तर पूजा

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर स्विमिंग ग्रुपतर्फे ग्रामदैवत श्री शंकराचार्य मठात श्रावण मासारंभ निमित्त शिवअष्टोत्तर (शतकावली) पूजा आरंभ करण्यात आली आहे. शिवअष्टोत्तर पूजा पुरोहित वामन पुराणिक यांच्याकडून केली जात आहे. ते दररोज सकाळी ७ वाजता संपूर्ण श्रावणमासमध्ये शिव अष्टोत्तर पूजा करणार आहेत. त्यांनी स्विमिंग ग्रुपच्या सदस्यांना शिवकालीन शिवअष्टोत्तर पूजेचे …

Read More »

मोटारसायकलवरून जाताना तीव्र हृदयघाताने अरुण नेसरी यांचे निधन

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सुभाष रस्ता येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण उर्फ भुट्टो दुंडप्पा नेसरी (वय ५५) यांचे आज सकाळी ११.३० वाजता तीव्र हृदयघाताने निधन झाले. सकाळपासून त्यांना थोडसे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी डॉ. टी. एस. नेसरी यांच्याकडे आरोग्य तपासणी करुन घेतली होती. डाॅक्टरांनी त्यांना एसीजी तपासणीचा सल्ला दिला …

Read More »

जांबोटीवाड्यात नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम अशा पश्चिम भागातील जांबोटीवाड्यात नवीन अंगणवाडीचे उद्घाटन नुकताच करण्यात आले. आरडीएफ योजनेअंतर्गत१७ लाख रूपये अनुदानातून खर्चून बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन आमदार निंबाळकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. प्रारंभी खानापूर बालकल्याण खात्याचे अधिकारी सीडीपीओ राममूर्ती के. व्ही. यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सुपरवायझर …

Read More »

उपचारासाठी मदतीचे आवाहन

  खानापूर : येथील रहिवासी अँजेल हुराली यांना ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. अवघ्या तीन वर्षाचा मुलगा आहे. सद्या त्यांच्यावर बेंगळूर येथे उपचार सुरु आहेत. हा कॅन्सर एक्युट मायलॉइड ल्युकेमिया पद्धतीचा त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज आहे. त्या उपचारासाठी तब्बल २१ लाख खर्च आहे. त्यांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना …

Read More »

सदलग्यातील ड्रेनेज प्लँटला शासकीय अधिकाऱ्यांची भेट : संतप्त शेतकऱ्यांनी विचारले प्रश्न

सदलगा : सदलग्यातील भूमीगत सांडपाणी व्यवस्थेचे ड्रेनेज प्रक्रिया केंद्राला कर्नाटक शासकीय अधिकाऱ्यांनी आज भेट दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रो. मोहनकुमार आणि प्रो.राव, केयुडब्ल्युएस धारवाडचे मुख्य अभियंता श्री. टी. एन्. मुद्दुराजण्णा, केयुडब्ल्युएस बेळगांवचे कार्यकारी अभियंता सुरेश मोरवाल, केयुडब्ल्युएस चिकोडीचे सहायक कार्यकारी अभियंता आर के उमेश आदींचा या अधिकाऱ्यांमध्ये समावेश होता. …

Read More »

सरकारी मराठी मुलांची शाळा आणि कन्नड शाळेच्या स्वयंपाक खोलीच्या बांधकाम कामाचा शुभारंभ

  सौंदलगा : येथील सरकारी मराठी मुलांची शाळा आणि कन्नड शाळेसाठी ग्रामपंचायत एन.आर.जी. फंडातून मंजूर झालेल्या स्वयंपाक खोलीच्या बांधकाम कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थित करण्यात आला. सुरुवातीला एसडीएमसी अध्यक्ष शंकर कदम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी सनदी, शोभा कोळी, एसडीएमसी सदस्या प्रियंका कोळी, शिक्षिकांच्या हस्ते जागेचे …

Read More »