Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

कालमणी व्हाया आमटे बससेवा सुरू होणार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिजंगल भागातील आमटे गावातून बससेवेने या भागातील जवळपास 80 ते 90 विद्यार्थी शाळा, कॉलेज शिक्षणासाठी खानापूरला नियमित ये-जा करतात. मात्र अलीकडे बससेवा बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना खासगी ट्रॅक्स, टॅपो, दुचाकीवरून खानापूरला ये-जा करावे लागते. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्या कॉलेजच्या मुलीना प्रवास करणे धोक्याचे झाले …

Read More »

डॉ. अंजलीताई फाऊंडेशनतर्फे स्कूल बॅग वाटप

खानापूर : खानापूर येथील सरकारी शाळेतून डॉ. अंजलीताई फाऊंडेशनच्या माध्यमातून स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी स्वत: आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर, खानापूरचे तहसीलदार, पट्टन पंचायतीचे अध्यक्ष मजहर खानापूरी तसेच सर्व नगरसेवक, एसडीएमसी अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच ब्लॉक काँग्रेसचे महादेव कोळी, मधू कवळेकर, महिला अध्यक्षा, महिला ब्रिगेड आदी उपस्थित …

Read More »

अलमट्टी धरणातून 1 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

बेळगाव : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून आज (दि.12) सकाळी 10 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग 75 हजारावरुन 1 लाख क्युसेक करण्यात आला आहे. गेली दोन दिवस या धरणातून पाण्याचा विसर्ग 75 हजार क्युसेक करण्यात येत होता. या धरणाची क्षमता 123 टीएमसी असून सध्या या धरणात …

Read More »

मुसळधार पावसामुळे गर्लगुंजीत मराठी मुलांच्या शाळेची तिसरी वर्गखोली जमीनदोस्त

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या तालुक्यात मुसळधार पाऊस चालु आहे. त्यामुळे गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीची तिसरी वर्गखोली जोरदार पावसाने जमीनदोस्त झाली. याआधी शुक्रवारी रात्री एक वर्गखोली कौलारू छतासह जोरदार पावसामुळे जमीनदोस्त झाली तर इतर खोल्या पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या 85 वर्षा पूर्वीची गर्लगुंजी मराठी मुलाच्या …

Read More »

शिक्षणाला परिश्रमाची जोड हवी : श्री अदृश्य काडसिध्देश्वर महास्वामीजी

संकेश्वर (महंमद मोमीन) : शिक्षणाला परिश्रमाची जोड हवी असल्याचे कणेरी मठाचे परमपूज्य श्री अदृष्य काडसिध्देश्वर महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर येथील एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेच्या नूतन वास्तू उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊन श्रींनी शिक्षण कसे असायला हवे असल्याचे सांगितले. प्रारंभी शाळेय मुलींनी शानदार नृत्य सादर केले. उपस्थितांचे स्वागत …

Read More »

कोगनोळी तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस जवळ तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान झाल्याची घटना सोमवार तारीख अकरा रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,  बेळगावहून कोल्हापूरकडे जात असणाऱ्या आयशर ट्रकने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस येथे अचानक ब्रेक मारल्याने बेळगावहून …

Read More »

कागिनेले येथे बुधवारी महासंस्थान गुरुवंदना कार्यक्रम

समाज बांधवांनी उपस्थित रहावे: लक्ष्मण चिंगळे यांचे आवाहन निपाणी (वार्ता) : कागिनेले महासंस्थान, कनकगुरुपिठाचे प्रथम जगत्गुरु बिरेंद्र केशव तारकानंदपुरी महास्वामीजी यांचे १६ वे पुण्यस्मरण व गुरुपोर्णिमेनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम बुधवारी (१३) सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. यावर्षी बेळगांव जिल्हा धनगर समाज बांधवाकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी पावनसानिध्य …

Read More »

गोमतेची हत्या रोखा 

तहसीलदारांना निवेदन : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी निपाणी : शहर व ग्रामीण भागात हिंदू धर्मियांचे श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गोमातेची हत्या रोखण्यात यावी. यासाठी हिंदुत्ववादी युवकांनी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना निवेदन दिले. यावेळी समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. निवेदनामधील माहिती अशी, काही धर्मांध लोक हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेच …

Read More »

शेतकरी हुतात्मा दिनास उपस्थित राहावे

राजू पोवार : धारवाडमध्ये संघटनेची कार्यकारिणी बैठक निपाणी (वार्ता) : सरकारच्या तकलादू धोरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीतच सापडत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. पण सर्वे मध्ये पक्षपातीपणा केला जात असल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी …

Read More »

नामदेव मंदिरात एकादशी साजरी

निपाणी (वार्ता) : येथील माऊली फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त नामदेव मंदिरात सोमवारी(ता.११)  द्वादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणीकर सरकार व समराजलक्ष्मी राजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी स्वागत केले. कार्यक्रमास रवी गुळगुळे, …

Read More »