Monday , September 21 2026
Breaking News

डॉ. अंजलीताई फाऊंडेशनतर्फे स्कूल बॅग वाटप

Spread the love

खानापूर : खानापूर येथील सरकारी शाळेतून डॉ. अंजलीताई फाऊंडेशनच्या माध्यमातून स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या.
यावेळी स्वत: आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर, खानापूरचे तहसीलदार, पट्टन पंचायतीचे अध्यक्ष मजहर खानापूरी तसेच सर्व नगरसेवक, एसडीएमसी अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच ब्लॉक काँग्रेसचे महादेव कोळी, मधू कवळेकर, महिला अध्यक्षा, महिला ब्रिगेड आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते विद्यर्थ्यांना बॅग वाटप करण्यात आले.
फाऊंडेशनतर्फे उपस्थितांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थितांनी आपल्या भाषणात अंजलीताईंच्या कार्याचे विशेष कौतुक केले. आमदार डॉ. अंजली निंबाळकर या स्वत: उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांनी नेहमीच शिक्षणाला महत्व दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी नेहमीच सकारात्मक पाऊले उचलली आहेत. सरकार दरबारी देखील त्या शैक्षणिक दर्जा सुधारावा या दृष्टीने सतत पाठपुरावा करत असतात त्याचाच एक भाग म्हणून त्या नेहमी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत असतात. तालुक्यातील जवळपास 50 हजार विद्यार्थ्यांना या बॅग वाटप करण्यात येणार आहेत.
अंजलीताई फाऊंडेशनतर्फे प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना या स्कूल बॅग देण्यात येणार आहेत तसेच सर्व शिक्षकांना सुद्धा ऑफिस बॅग देण्यात येणार आहेत, असे फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *