प्रवासी वर्गातून नाराजी : त्वरित रस्ता दुरुस्तीची मागणी कोगनोळी : येथील कोगनोळी हंचिनाळ रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून या रस्त्याची मोठी दुरावस्था निर्माण झाल्याने वाहनधारकांच्यातून मोठी नाराजी निर्माण झाली आहे. सध्या सुरू झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात …
Read More »कोगनोळी दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ
कोगनोळी : सोमवारी सकाळपासून कोगनोळीसह सीमाभागात संततधार पाऊस सुरु असून मंगळवारीही दिवसभर संततधार पाऊस सुरु होता. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले होते. या पावसामुळे येथील दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. मागील २४ तासात येथील दूधगंगा नदी पाणी पातळीत ५ फुटांची वाढ झाली आहे. गेले …
Read More »खानापूर -रामनगर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा : खानापूर म. ए. समितीची मागणी
खनापूर : रामनगर ते रुमेवाडी क्रॉस खानापूर हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निवेदनाद्वारे खानापूर तहसीलदारांकडे करण्यात आली. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन खानापूर तहसीलदारांना देण्यात आले. खानापूर -रामनगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे …
Read More »केरूर येथे जातीय संघर्षात तिघांवर चाकू हल्ला
चारजण जखमी, जाळपोळीच्या घटना, १८ जणाना अटक बंगळूर : बागलकोट जिल्हा पोलिसांनी केरूर येथे झालेल्या दोन गटातील हाणामारीच्या प्रकरणी नऊ जणांना अटक केली आहे, असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी गुरूवारी (ता. ७) सांगितले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, या घटनेच्या संदर्भात केरूर आणि आसपासच्या भागातील १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. …
Read More »खनदाळ येथे आषाढीला श्रीसंत सद्गुरू बाळूमामा धार्मिक उत्सव
संकेश्वर (महंमद मोमीन) : खनदाळ तालुका गडहिंग्लज येथील श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरात आषाढीला विविध धार्मिक कार्यक्रमांंचै आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान विश्वस्त कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. येत्या रविवारी १० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशीला निलजी ते खनदाळ श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरापर्यंत दिंडी सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी प्रवचन, पूजा, …
Read More »कोगनोळी येथील भाविक पंढरपूरला रवाना
कोगनोळी : पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त विठोबा दर्शनासाठी कोगनोळी तालुका निपाणी येथील शेकडो भाविक मंगळवार दि. 5 जुलै रोजी बसने रवाना झाले. येथील ग्रामदैवत श्री अंबिका मंदिराजवळ बापूसाहेब पिडाप पाटील व बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते बसचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना बापूसाहेब पाटील म्हणाले, कोगनोळी वारकरी व भाविकांच्या …
Read More »पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत आवाज उठवावा!
फिरोज चाऊस : दोशी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात दहावी परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे सदस्य प्रशांत गुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे अध्यक्ष फिरोज चाऊस होते. फिरोज चाऊस म्हणाले, विद्यार्थ्यांना या विद्यालयात शिकायला मिळाले …
Read More »नवनियुक्त नगरनियोजन सदस्य विश्वनाथ जाधव यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील नगरनियोजन समितीच्या सदस्यपदी शासनावतीने नियुक्त करण्यात आलेले सदस्य विश्वनाथ जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. येथील गुडमॉर्निंग वॉकिंग ग्रुप वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी निपाणी नगरपालीकेचे माजी सभापती संदीप कामत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या पदाच्या माध्यमातून शहराच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही जाधव …
Read More »निपाणीत आज पोलिस ठाणे इमारतींचे उद्घाटन
गृहमंत्र्यांची उपस्थिती : प्रशासनाकडून तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : येथील मंडल पोलिस निरीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शहर व ग्रामीण या दोन पोलिस ठाण्यांच्या नूतन सर्व सोयींनी युक्त इमारतींचे बांधकाम आठवड्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. या इमारतींचे उद्घाटन गुरूवारी (ता. ७) सकाळी १० वाजता धर्मादाय खात्याचा मंत्री शशिकला जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली होणार …
Read More »यंदाच्या पूरस्थिती पूर्वीच योग्य नियोजन करा
राजू पोवार : रयत संघटनेने घेतली तहसीलदारांची भेट निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील पावसाला निपाणी तालुक्यात सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वेदगंगा, दूधगंगा आणि पंचगंगा नद्यांची पाणीपातळीही वाढल्याने आठवड्याभरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. तसेच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta