Sunday , July 26 2026
Breaking News

कोगनोळी-हंचिनाळ रस्त्याची झाली दुरावस्था

Spread the love

प्रवासी वर्गातून नाराजी : त्वरित रस्ता दुरुस्तीची मागणी
कोगनोळी : येथील कोगनोळी हंचिनाळ रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून या रस्त्याची मोठी दुरावस्था निर्माण झाल्याने वाहनधारकांच्यातून मोठी नाराजी निर्माण झाली आहे. सध्या सुरू झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता खराब झाल्याने या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात होऊन अनेक वाहन चालक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याकडे त्वरित लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी हंचिनाळ, कोगनोळी, कोळी मळा, खडक मळा यासह अन्य ग्रामस्थातून होत आहे.
हा रस्ता नादुरुस्त झाला आहे यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता सदर रस्ता मंजूर झाला आहे. असे सांगण्यात आले पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात नसल्याने हा रस्ता कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोगनोळी, हंचिनाळ हा रस्ता मोठ्या प्रमाणात रहदारीचा असून कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, शिरोली औद्योगिक वसाहत, कोल्हापूर, कागल येथे मोठ्या प्रमाणात रोज नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या दुचाकी स्वरांची मोठी वर्दळ असते. मुख्य रस्ता खराब झाला असल्याने या दुचाकीस्वारांना मोठा त्रास होऊ लागला आहे. याकडे संबंधित अधिकारी यांनी ताबडतोब लक्ष देऊन रस्ता चांगला व मजबूत तयार करून द्यावा, अशी मागणी येथील युवक वर्गाकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *