Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

नायकोल शिवारात गविरेड्याकडून भात पिकांचे प्रचंड नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : नायकोल (ता. खानापूर) गावाच्या शिवारात हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. माणिकवाडी गावचे शेतकरी आपाणा गावडा यांची नायकोल गावाशेजारी असलेल्या भात पिकांत गविरेड्याच्या कळपाने घुसून प्रचंड नुकसान केले आहे. गेल्या पंधरा दिवसापासुन सुगीच्या हंगामात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. …

Read More »

लोकांना तिष्ठत ठेवून कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; बिडीतील पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

खानापूर : बिडी ग्रामपंचायतीसह खानापूर तालुक्यातील काही ग्रापंच्या पिडीओनी कचेरीत लोकांना तिष्ठत ठेवून ओली पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तहसीलदार आणि तालुका पंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. गावपातळीवर पिडीओंच्या मनमानीबाबत अनेक तक्रारी ऐकू येतात. त्याहून अधिक धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील बिडी गावात घडला आहे. बिडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह …

Read More »

कुर्ली येथे राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग; लाखो रुपयांचे नुकसान

कोगनोळी : कुर्ली ता. निपाणी येथील शिंदे गल्लीत राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवार तारीख 30 रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कुर्ली तालुका निपाणी येथील शिंदे गल्लीत आप्पासाहेब शामराव पाटील, लक्ष्मीबाई संभाजी पाटील यांचे राहते घर आहे. मंगळवार तारीख …

Read More »

उगार साखर कारखाना कर्मचार्‍यांचा संप : संपामुळे कारखाना बंद

कागवाड : कागवाड तालुक्यातील उगार शुगर वर्क्स हा कारखाना कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे बंद ठेवण्यात आला आहे. या कारखान्यातील कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय यादव, अनिल नावलीगेर, कल्लाप्पा करगार, गुंडू कदम, खालील खुदावंत यांच्या नेतृत्वाखालील शेकडो कार्यकर्त्यांनी अनियमित काळासाठी संप पुकारला …

Read More »

दोषी विमा कंपन्यांवर कारवाई करू : कृषी मंत्री बी. सी. पाटील

हुबळी : पीक विम्याची फसवणूक केली जाणार नाही. फसवणूक करणार्‍या कंपन्यांना ताकीद देण्यात आली असून ज्या कंपन्यांवर आरोप करण्यात आले आहेत, अशा कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी दिले आहे. हुबळी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली असून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्जाबद्दल नोंदी …

Read More »

विमान प्रवाशांसाठी आरटीपीसीआरची सक्ती : डॉ. सुधाकर

बेंगळुरू : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विमानतळांवर येणार्‍या प्रवाशांची सक्तीने आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर आज बुधवारी बेंगलोर विमानतळाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी …

Read More »

फ्रंटलाइन कामगारांना कोविड बूस्टर देण्यासाठी प्रयत्नशील : मुख्यमंत्री बोम्माई

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई राज्यातील फ्रंटलाईन कामगारांसाठी कोविड बुस्टर डोस मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी बुधवारी सांगितले की, केंद्र सरकारचे मत याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आरोग्य आणि आघाडीच्या कामगारांना अँटी-कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याच्या मुद्द्यावर झालेल्या वैज्ञानिक प्रगतीची स्थिती जाणून घेऊन राज्यातील तज्ञांनी अनुकूलता व्यक्त केली असल्याने …

Read More »

सर्व देशातील प्रवाशांची कर्नाटकात चाचणी, क्वॉरंटाईन

तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय : रोज 2500 विदेशी प्रवाशी बंगळूरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या सूचनेनुसार, राज्य कर्नाटकात येणार्‍या सर्व देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड-19 चाचणी करेल. याआधी, ज्या देशांत ओमिक्रॉन व्हेरियंट सापडला आहे अशा देशांतील प्रवाशांसाठी अनिवार्य आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. …

Read More »

बेपत्ता मुलगा सापडला सुखरूप चिखलात!

विजापूर : घरातून बेपत्ता झालेला मुलगा दुसर्‍या दिवशी चिखलात पण सुखरूप सापडल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील बनोशी गावात घडली. मुद्देबिहाळ तालुक्यातील बनोशी गावातील संतोष मादर हा बालक कालपासून घरातून बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी अनेक ठिकाणी शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्याच्या घरचे चिंतेत होते. संतोष मानसिकदृष्ट्या अस्वस्थ …

Read More »

विधानपरिषद निवडणूक; तिरंगी लढतीने चुरस

निपाणीतील 534 मते कोणाच्या पारड्यात : राजकीय तर्कवितर्कांना उधाण निपाणी : येत्या 10 डिसेंबरला विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात तिरंगी लढत होणार असून भाजपचे महांतेश कवठगीमठ, काँग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी व लखन जारकीहोळी हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत. सर्वांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. दरम्यान या निवडणुकीत निपाणी तालुक्यात 534 …

Read More »