Monday , September 21 2026
Breaking News

खानापूरात क्षत्रिय मराठा संघटनेच्या गुरूवंदना कार्यक्रमाची बैठक संपन्न

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा संघटनेची येत्या 19 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना या कार्यक्रमाच्या तयारीची बैठक खानापूर विद्यानगरातील संघटनेच्या कार्यालयात शनिवारी पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे बेळगांव जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार होते. तर बैठकीला महिला अध्यक्षा सौ. डॉ. सोनाली सरनोबत, तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गुरूवंदना कार्यक्रमात परमपूज्य श्री श्री श्री स्वामी याची उपस्थिती राहणार आहे. यासाठी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी तालुक्यात विभागावार समिती नेमण्यावर चर्चा करण्यात आली. यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन गुरूवंदना कार्यक्रमाबदल माहिती देण्यावर भर देणे. गुरूवंदना कार्यक्रमात खेड्यापाड्यातून जास्तीत जास्त नागरिकांना उपस्थित राहण्याबद्दल मार्गदर्शन करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी डॉ. सोनाली सरनोबत, तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई, भाजप नेते किरण यळ्ळूरकर आदींनी विचार मांडले.
बैठकीला रमेश पाटील, उपाध्यक्ष सीताराम बेडरे सर, शहर अध्यक्ष अप्पया गुरव (हरिबोल), ऍड. एच. एन. देसाई, भाजप नेते पंडीत ओगले, दयानंद चोपडे, नारायण कदम, संदीप शेमले, विशाल पाटील, सुनिल झुंजवाडकर, कार्याध्यक्ष अमृत पाटील, व्हन्नापा (बाबू) शिमनगौडर देवलत्ती, अध्यक्ष पूर्व विभाग श्रीपाद जोशीलकर तळवडे, मारुती शिमनगौडर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार सचिव रमेश पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *