Monday , September 21 2026
Breaking News

बनजवाडला पार्श्वनाथ भवनचे उद्घाटन

Spread the love

आ. श्रीमंत पाटील यांची उपस्थिती : पंचकल्याण महोत्सवात सहभाग
अथणी : बनजवाड येथे ध्यानोपासना निवास व पार्श्वनाथ भवनचे उद्घाटन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते झाले. येथे पार पडलेल्या पाचव्या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवात त्यांनी सहभाग नोंदवत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी उपस्थित होते.
प्रारंभी आमदार पाटील यांनी येथील जैन बस्तीला भेट देऊन भगवान महावीरांचे दर्शन घेतले. भक्तांच्या सोयीसाठी येथे पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याची पाहणी देखील आमदार पाटील यांनी केली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार्श्वनाथ भवन व मुनींसाठी साठी ध्यानोपासना निवासाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक नेते, कार्यकर्ते व जैन समाजाचे सदस्य, माताजी, श्रावक व श्रावकीय व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *