Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

खानापूर युवा समितीच्या पाठपुराव्याला यश

बेळगाव : १६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूर यांच्यावतीने डेपो मॅनेजर श्री. आनंद शिरगुप्पीकर यांना निवेदन देण्यात आले होते की, खानापूर ते नागरगाळी हि बस संध्याकाळी ५.३० या नेहमीच्या वेळेवर सोडण्यात यावी, म्हणजे विद्यार्थ्यांचे वर्ग चुकणार नाहीत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण …

Read More »

निपाणीत सापडलेल्या अनाथ वैष्णवीचा सांभाळ बालकल्याण समितीकडे

कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथील भारतीय सेवा आश्रम संस्थापक अमर पोवार यांना निपाणी येथे सापडलेल्या अनाथ लहान मुलीचा सांभाळ आता बाल कल्याण समितीकडे होणार असल्याची माहिती बालकल्याण समिती सदस्या उमा भांडणकर यांनी सांगितले. मंगळवार तारीख 23 रोजी मत्तीवडे तालुका निपाणी येथील भारतीय सेवा आश्रम येथे लहान अनाथ वैष्णवीला बाल …

Read More »

खानापूर पशुखात्याच्या मुख्यमंत्री अमृत योजनाचा निकाल लांबणीवर

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पशु खात्याच्यावतीने सन 2020-21 सालामध्ये मुख्यमंत्री अमृत योजना निकाल लांबणीवर पडल्याची चर्चा तालुक्यातून होत आहे. पशुखात्याकडून मुख्यमंत्री अमृत योजनेसाठी आलेल्या अर्जाची छाननी करून तालुका लोकप्रतिनिधींच्याकडे निवड करण्यासाठी पाठविण्यात आले असून अजूनही मुख्यमंत्री अमृत योजनेचा निकाल अद्याप झालेला नाही. मात्र शेतकरीवर्गातून निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे. …

Read More »

विधानपरिषद निवडणुकीत विरोधकांची जागा दाखवून द्या

केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी : विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर निपाणीत मेळावा निपाणी : केंद्रातील भाजपा सरकार सहा वर्षे तर राज्यातील भाजप सरकार अडीच वर्षे काम करूनही शेतकर्‍यांच्या विरोधात कायदे करून त्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केले आहेत. वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये तब्बल सातशे शेतकर्‍यांचा बळी गेला आहे. तरीही या सरकारला सर्वसामान्यांची कीव …

Read More »

बेनाडीचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

निपाणी : बेनाडी (ता. निपाणी) येथील ग्रामदैवत प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर अखेरपर्यंत भरणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक सात वाजता भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केले आहे. यासाठी तीन किलोमीटर अंतरासाठी मोफत …

Read More »

बोरगाव ‘अरिहंत’ सौहार्दला 6.5 कोटीचा नफा

संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील :31वी वार्षिक सभा निपाणी : ग्रामीण भागात स्थापन होऊन शहराकडे झोपावून सक्षम झालेल्या व सर्वसामान्यांच्या अर्थवाहिनी असा नावलौकिक मिळवलेल्या, राज्यात सहकार क्षेत्रात आदर्श ठरलेल्या श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेचे संचालक मंडळाचे मार्गदर्शन, प्रभावी व्यवस्थापन व सेवकांचे परिश्रम यांच्या जोरावर कोरोना संसर्गाच्या काळातही संस्थेमध्ये 139 कोटींनी ठेवीमध्ये …

Read More »

महांतेशआण्णा कवठगीमठ यांच्या प्रचारार्थ सौंदलगा येथे सभा संपन्न

सौंदलगा : आडीमल्लया देवस्थान येथे विधान परिषद निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, नगरसेवक, नगरसेविका यांचा मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर प्रास्ताविकात भाजप ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील यांनी महांतेशआण्णा कवठगीमठ यांना निवडून देऊन, भारतीय जनता पक्ष विधान परिषदेत बळकट करा असे …

Read More »

बेळगावसह राज्यभरात एसीबीचे छापे; बेळगावात ३ ठिकाणी धाडी : परदेशी चलन आढळले

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात एसीबीने बुधवारी सकाळी–सकाळीच ३ अधिकाऱ्यांच्या घरांवर धाडी टाकून बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आणली. त्यातही बेळगाव शहरात टाकलेल्या धाडीत विदेशी चलन आढळून आले. या धाडसत्रामुळे सरकारी अधिकाऱ्यांत खळबळ माजली आहे.होय, अँटी करप्शन ब्युरोने आज बेळगावसह राज्यभरात एकाचवेळी धाडी घालून एकच खळबळ उडवून दिली. तब्बल ६० ठिकाणी या धाडी …

Read More »

मुरडेश्वराच्या शिवमुर्तीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी

इसिसच्या मुखपत्रात मुर्डेश्वराची भग्न मुर्ती : बंदोबस्तात वाढ बंगळूर : कर्नाटकातील प्रसिध्द पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखण्यात येत असलेल्या मुर्डेश्वर देवस्थानावर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी पडली आहे. कुख्यात इसिस दहशतवादी संघटनेच्या ’द व्हाईस ऑफ हिंद’ या पत्रकात मुर्डेश्वर येथील शिवाची भग्न मुर्ती प्रसिध्द केल्याने सोशल मेडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे देवस्थानला …

Read More »

सीमावासीयांवरील अन्यायाविरोधात लोकसभेत आवाज उठविणार

खासदार धैर्यशील माने यांचे खानापूर युवा समितीला आश्वासन बेळगाव : बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय चेन्नई येथे स्थलांतर करण्यात आले आहे. याबाबत आवाज उठवून पुन्हा कार्यालय बेळगाव येथे आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आली आहे. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर …

Read More »