Sunday , July 26 2026
Breaking News

वीरशैव लिंगायत होण्यासाठी लिंगदिक्षा हवी : डॉ. चन्नसिध्दराम महास्वामी

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : लिंगायत कुटुंबात जन्मल्याने कोणी लिंगायत होत नाही. लिंगायत होण्यासाठी गुरुकडून लिंगदिक्षा घेण्याची आवश्यकता असल्याचे श्रीशैल्यचे डॉ. चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये आयोजित नागमल्लीकार्जुन याच्या अय्याचार कार्यक्रमात सहभागी होऊन श्रींनी आर्शिवचन दिले. श्रींच्या दिव्य सानिध्यात चि.नागमल्लीकार्जुन यांचा अत्याचार आणि महेश्वर मंत्रोपदेश कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. चन्नसिध्दराम महास्वामीजी पुढे म्हणाले, अय्याचार आणि महेश्वर मंत्रोपदेशाने नागमल्लीकार्जुया बनला आहे. त्याच्या हातून समाजाचे सत्कार्य घडावे. संकेश्वरात तब्बल दिडशे वर्षानंतर प्रथमच विशिष्ट पद्धतीने चिरंजीव नागमल्लीकार्जुन यांचा अय्याचार आणि महेश्वर मंत्रोपदेश कार्यक्रम पार पडल्याचे श्रींनी सांगितले. चि.नागमल्लीकार्जन यांचा अय्याचार आणि महेश्वर मंत्रोपदेश कार्यक्रमाला श्रीशैलचे जगद्गुरु डॉ. चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानिू्ंसह भारती महास्वामीजी, हत्तरगी मठाचे श्री गुरुसिध्देश्वर महास्वामीजी, नूल सुरगेश्वर संस्थान मठाचे श्री गुरुसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले. यावेळी श्रीमती शकुंतला शशिधर हिरेमठ, मोहन शशिधर हिरेमठ, सौ. विद्या मोहन हिरेमठ, संजय शशिधर हिरेमठ, सौ. साधना संजय हिरेमठ, युवानेते पवन कत्ती, कुणालगौडा पाटील, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, बसनगौडा पाटील, अप्पासाहेब पचंडी, मल्लिकार्जुन ऊर्फ रावसाहेब देसाई, हनुमंत हेदुरशेट्टी, नंदू मुडशी, आनंद शिरकोळी, विरुपाक्ष मलकट्टी, मल्लिकार्जुन शिरहट्टी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत संजय शशिधर हिरेमठ यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *