Monday , September 21 2026
Breaking News

कराटेपटू पुजा पाटील हिला ब्लॅकबेल्ट प्रदान

Spread the love


बेळगाव : कराटेपटू पुजा पाटील हिला ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आला. इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते पुजा पाटील हिला ब्लॅकबेल्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
हनुमान नगर बेळगाव, सेकंड स्टेज येथील श्री. हनुमान मंदिर सभागृहात दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी कराटेची बेल्ट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण 50 कराटेपटू सहभागी झाले होते. यामध्ये कराटेपटू पुजा पाटील हिला ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. बेळगाव जिल्ह्याचे मुख्य कराटे परीक्षक मास्टर गजेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली होती.
पुजा नारायण पाटील ही गेल्या 5 वर्षांपासून प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेचा सराव करीत आहे. तिने जिल्हास्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन अनेक पदके मिळविली आहेत.
हनुमान मंदिर सभागृहात घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबचे प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, परशुराम काकती, विजय सुतार, निलेश गुरखा, नताशा अष्टेकर आणि हेमलता ग. काकतीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
ब्लॅक बेल्ट मिळविलेल्या कराटेपटू पुजा पाटील हिला ब्लॅक बेल्ट आणि प्रमाणपत्र प्रदान केल्यानंतर पूजा पाटील हिचा तसेच तिला कराटे खेळासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल तिचे पालक नारायण पाटील व अनिता पाटील यांना इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *