Thursday , September 19 2024
Breaking News

कर्नाटक

चन्नेवाडीच्या समृद्धी पाटील हिने कमावले सुवर्ण पदक

  खानापूर : पॉंडीचेरी येथे 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान केंद्र सरकारच्या “खेलो इंडिया” स्पर्धेअंतर्गत भारतीय त्वायकांदो फेडरेशन व पॉंडीचेरी स्पोर्ट्स असोसीएशन यांनी आयोजित केलेल्या, 52 किलो “त्वायकांदो” या स्पर्धा प्रकारात मूळ चन्नेवाडी ता. खानापूर व सध्या रा. फोंडा गोवा येथील कुमारी समृद्धी शिवाजी पाटील हिने सुवर्णपदक पटकावले, तिला …

Read More »

शॉर्टसर्किटमुळे ट्रॅव्हल बस जळून खाक; संकेश्वरजवळील घटना

  सुदैवाने ४० जणांचे प्राण वाचले निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वरनजीक सोलापूर गेटजवळ आज (शुक्रवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये किंमती साहित्य तसेच संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने चालक, क्लीनरसह 40 प्रवाशांचे प्राण वाचले. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मुंबई …

Read More »

जातनिहाय जनगणनेचा अहवाल राज्य सरकारला सादर

  मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेणार बंगळूर : बहुचर्चित जातनिहाय गणती (कर्नाटक सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण) अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. वीरशैव लिंगायत आणि वक्कलीग समुदायांच्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर स्थायी मागास आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे यांनी गुरुवारी कांतराज समितीच्या डेटाच्या आधारे तयार केलेला अहवाल अधिकृतपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान विरोधकांचे धरणे, सभात्याग कागदपत्रे फाडून संताप व्यक्त

  बंगळूर : विधानसौधमध्ये पाकिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्यांना हजर करावे, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत काल विधानसभेत आंदोलन सुरू ठेवलेल्या भाजप आमदारांनी आजही धरणे आंदोलन पुढे चालूच ठेवले. सभागृदात कागदपत्रे फाडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली व मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान सभात्याग केला. आज सकाळी सभागृहाचे कामकाज …

Read More »

बेळगावकडे येणाऱ्या बसची एक्टिव्हाला धडक; मायलेकीचा मृत्यू

  होन्नावर : मंगळूरहून बेळगावकडे येणाऱ्या केएसआरटीसी बस आणि एक्टिव्हा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आई व मुलगी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मानकी येथील गुळदकेरीजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. सविता राजू आचारी (वय 40) आणि मुलगी अंकिता (वय 17) राहणार नाडवरकेरी, मावळी मुरडेश्वर या मायलेकीचा अपघातात मृत्यू झाला आहे. मृत …

Read More »

बहिणीची भेट घेऊन घरी परतणाऱ्यावर काळाचा घाला

  खानापूर : करंबळ आणि बेकवाड येथील यात्रा आटोपल्यानंतर रूमेवाडीतील आपल्या बहिणीची भेट घेऊन घरी परतणाऱ्या इसमाचा अपघातात मृत्यू झाला. नारायण भगवंत पाटील (वय 47, राहणार : माडीगूंजी ता. खानापूर) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नंदगड येथील महात्मा गांधी हायस्कूल समोर हा अपघात घडला. नारायण भगवंत पाटील हे …

Read More »

मराठा मंडळ हायस्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान

  निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित मराठा मंडळ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला. अध्यक्षस्थानी संगीता रविंद्र कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून कुर्ली सिद्धेश्वर विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते. के. एस. देसाई यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक डी. डी. हळवणकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर …

Read More »

मेंढपाळाच्या मुलाची सैन्य दलात भरारी

  बेनाडीच्या मारुती हजारेचे यश‌ : दीडच वर्षात मिळवले यश निपाणी (वार्ता) : गेल्या काही वर्षापासून सैन्य दलात भरती होण्यासाठी अनेक युवक सराव करीत आहेत. त्यामध्ये अनेक जण यशस्वी होत आहेत. बेनाडी येथील मेंढपाळ व्यवसायिक आप्पासाहेब हजारे यांचा मुलगा मारुती हजारे यांनी केवळ दीड वर्षाच्या सरावानंतर त्याची सैन्य दलात निवड …

Read More »

हैदराबादहून बेळगावकडे येणारी खासगी बस उलटली; 10 प्रवासी गंभीर जखमी

  गंगावती : हैदराबादहून बेळगावला जाणारी खासगी बस गंगावती तालुक्यातील हेमगुड्डा एचआरजी नगरजवळ उलटली, यात 10 प्रवासी गंभीर जखमी झाले. समोरून येणाऱ्या बोलेरो वाहनाला चुकवण्यासाठी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमधून 50 हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी 10 जण गंभीर जखमी झाले. 8 जणांवर गंगावती शासकीय रुग्णालयात …

Read More »

राज्यातील वीज दरात कपात; वीज ग्राहकांना आनंदाची बातमी

  बंगळूर : राज्यातील वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज दिलेली असतानाच, पुन्हा वीजेचे दर कमी करून वीज ग्राहकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. सरासरी १०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर आकारण्यात येणारे विजेचे दर कमी करण्यात आले आहेत. अशा ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटवर एक रुपये १० पैशांची कपात …

Read More »