खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून तालुक्याच्या विविध गावात प्रचारासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी लोकोळी, तोपिनकट्टी आदी भागामध्ये प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांच्या घरोघरी जाऊन समितीचे कार्य आणि मराठी भाषा …
Read More »राज्यातील पहिल्या टप्प्यात आज मतदान
१४ मतदारसंघ; २,८८,३४२ जण बजावणार मतदानाचा हक्क बंगळूर : राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांत उद्या (ता. २६) पहिल्या टप्यात मतदान होणार असून, निवडणूक आयोगाने शांततेत व मुक्त वातावरणात मतदान व्हावे यासाठी सर्व तयारी केली आहे. उद्या होणाऱ्या मतदानात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, म्हैसूर राजघराण्याचे सदस्य यदुवीर दत्त वडेयार, उपमुख्यमंत्री डी. के. …
Read More »नेहा हिरेमठ खून प्रकरण : सीआयडी पथकाच्या तपासाला वेग
हुबळी : हुबळी येथील नेहा हिरेमठ नामक युवतीच्या झालेल्या खुनाचा तपस करण्यासाठी सीआयडी अधिकारी नेहा हिरेमठच्या घरी चौकशीसाठी पोहोचले आहेत. नेहा हिरेमठच्या कुटुंबियांकडून माहिती जाणून घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी सीआयडी एसपी व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी नेहा हिरेमठच्या घरी पोहोचले आणि पुढील तपासासाठी हिरेमठ कुटुंबियांकडून माहिती घेतली. यावेळी नेहाची आई …
Read More »शेतकऱ्यांचे हित जपणारा खासदार हवा
राजू पोवार; निपाणीत बैठक निपाणी (वार्ता) : प्रत्येक पाच वर्षांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होतात. प्रत्येक वेळी उमेदवार विकास कामांच्या आश्वासनासह शेतकऱ्यांना नवनवीन योजनांचा लाभ देणार असल्याचे सांगतात. पण देशाचा अन्नदाता म्हणून समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याकडे मात्र निवडणुकीनंतर सर्वच नेते मंडळींचे दुर्लक्ष होते. त्यामुळे या निवडणुकीत शेतकऱ्यांचे हित जोपासणारा खासदार …
Read More »समिती उमेदवारांना युवा समिती निपाणीचा जाहीर पाठिंबा
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी, संघटनेच्या भिवशी येथे काल बुधवारी पार पडलेल्या बैठकीत म. ए. समितीचे कारवार लोकसभेचे उमेदवार निरंजन सरदेसाई तसेच बेळगाव मधील उमेदवार महादेव पाटील यांना जाहीर समर्थन देऊन पाठिंबा देण्यात आला. तसेच हुबळी येथील दुर्दैवी कन्या नेहा हिरेमठ हिला श्रद्धांजली वाहण्यात आली. सदर बैठकीच्या …
Read More »समितीला मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडावी
खानापूर : मराठी शाळा आणि आपली संस्कृती टिकली तरच पुढील काळात सीमाभागात मराठी भाषिकांचे अस्तित्व टिकणार आहे त्यामुळे समितीच्या उमेदवाराला मतदान करुन आपले कर्तव्य पार पाडा, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी …
Read More »कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात 2 ठार
खानापूर : लोंढ्याकडून बेळगावकडे येणारी महिंद्रा एक्सयुव्ही कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कार एका दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीस्वारासह कार मधील एकजण असे दोघे जागीच ठार झाले. तर चार जखमी झाल्याची घटना दुपारी तीनच्या दरम्यान खानापूर गणेबैलदरम्यान आयटीआय कॉलेज जवळ घडली. सदर अपघात इतका भीषण होता …
Read More »राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघात जाहीर प्रचाराची सांगता
बंगळूर : या महिन्याच्या २६ तारखेला राज्यातील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या १४ लोकसभा मतदारसंघांसाठीच्या जाहीर प्रचाराची काल सायंकाळी सांगता झाली. मतदान संपण्याच्या ४८ तास जाहीर प्रचाराची मोहीम संपली, त्यानुसार आज संध्याकाळी १४ लोकसभा मतदारसंघातील खुल्या प्रचाराची सांगता झाली. जाहीर प्रचाराचा समारोप लक्षात घेऊन मतदारसंघातील मतदार नसलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना व …
Read More »उमेदवार शंभू कल्लोळकर यांनी घेतली ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची भेट
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शंभू कल्लोळकर यांनी रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या निपाणी येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विषयावर चर्चा झाली. प्रारंभी शंभू कल्लोळकर यांचा राजू पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कल्लोळकर म्हणाले, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात प्रत्येक वेळच्या निवडणुकीत …
Read More »गॅरंटी योजनेमुळे काँग्रेस विजय होणार
माजी आमदार काकासाहेब पाटील; काँग्रेस कार्यालयात बैठक निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मतदारांना अनेक योजनांची गॅरंटी दिली होती. सरकार सत्तेवर येताच त्याची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये महिलासह सर्व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. बुधवारी (ता. २४) सायंकाळी …
Read More »