Tuesday , September 17 2024
Breaking News

देश/विदेश

झारखंड : कळपातून काढून टाकलेल्या हत्तीने १४ जणांना केले ठार

नवी दिल्ली : झारखंडमध्ये मागच्या महिन्यात जवळजवळ १४ नागरिकांना एका हत्तीने ठार केले आहे. या हत्तीने त्यांच्या कळपात चुकीची वर्तुणूक केल्याने त्याला बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. वन्य अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला आहे. २२ हत्तींच्या कळपातील १५ वर्षांच्या या हत्तीने गैरवर्तन केल्याने कळपातून बाहेर काढले होते. हत्ती कळपातून बाहेर गेल्यापासून …

Read More »

दहा दिवसांत बारावीच्या मूल्यांकनाची माहिती सादर करा!

सर्वोच्च न्यायालयाचे शाळा मंडळांना निर्देश नवी दिल्ली : येत्या दहा दिवसांत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीच्या मूल्यांकनाची माहिती सादर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. याशिवाय 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्याचा आदेशही न्यायालयाने शिक्षण मंडळांना दिला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईसह देशभरातील विविध शिक्षण मंडळांनी बारावीच्या परीक्षा रद्द …

Read More »

कसोटीत न्यूझीलंड ‘अजिंक्य’; टीम इंडियाचा ‘विराट’ पराभव!

साउदम्पटन – कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखत पराभव करून पहिलेवहिले कसोटी अजिंक्‍यपद आपल्या नावावर केले. सामन्यात सातत्याने पावसाच्या व्यत्ययानंतरही रंगतदार स्थितीत आलेला सामना कर्णधार केन विल्यम्सन (52) व रॉस टेलर (47) यांच्या नाबाद खेळीमुळे न्यूझीलंडने सहज खिशात घातला. त्यापूर्वी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीसमोर भारताचा …

Read More »

विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला मोठा झटका! ९ हजारांपेक्षा जास्त संपत्ती बँकांकडे हस्तांतरित

नवी दिल्ली: देशातील अनेक बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या उद्योजक विजय माल्या, हिरेव्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा झटका बसला आहे. कारण या तिघांच्याही हजारो कोटींची संपत्ती बँकांनी हस्तांतरित केली आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची मिळून तब्बल 9,371 कोटी रुपयांच्या मालमत्ता …

Read More »

बँक खात्याशी आधार, पॅन लिंक असेल तरच मिळणार जूनचा पगार!

बेळगाव : खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार आणि पॅनकार्ड लिंक केला असेल तरच त्यांना जून महिन्याचा पगार मिळणार आहे. प्राप्तिकर खात्याच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार आणि पॅनकार्ड लिंक केला नसेल तर त्यांचा जून महिन्याचा पगार खात्यावर जमा …

Read More »

अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलची कर्नाटकने सुचना स्वीकारली; मंत्री जयंत पाटीलांची माहिती

बेंगळुरू : पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याचे पाण्याची आवक-जावक, पाणीसाठा याबाबतची अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलसाठी आधुनिक रियल टाईम डाटा यंत्रणा बसवावी, अशी सूचना महराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंगळूरमध्ये झालेल्या बैठकीत केली. ती त्यांनी मान्य केल्याची माहिती मंत्री पाटील यांनी तातडीने सोशल मिडियावर जाहिर केली आहे. संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनांबाबत …

Read More »

ब्रेकिंग ! फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन

चंदीगड : फ्लाईंग शीख नावाने ओळखले जाणारे क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री उशिरा कोरोनामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. पाच दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनानंतरच्या गुंतागुंतीच्या आजारामुळे निधन झाले होते. मिल्खा सिंग यांच्यावर चंदीगड आयईएमआरमध्ये उपचार सुरू होते.  मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नी …

Read More »

कोरोना विरोधातील लस ‘संजीवनीच’! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना लसीबाबत एक अहवाल जारी केला आहे. देशात सर्वात आधी कोरोना लसीकरण करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अभ्यासासंबंधित हा अहवाल आहे. 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. सर्वात अगोदर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. ज्यांना ही लस देण्यात आली त्यांचा अभ्यास करण्यात आला. कोरोना लस …

Read More »

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप भारत-न्यूझीलंड सामना; पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया

साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला आहे. पावसाची संततधार आणि मैदानातील ओलावा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे या सामन्यासाठी नाणेफेकही झाली नाही. या सामन्यासाठी आयसीसीने …

Read More »

इंधन दरवाढीचा भडका कायम; पेट्रोल १०३ रुपयांवर, डिझेल ९५ रुपयांवर!

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरुच असून शुक्रवारी पेट्रोल दरात 27 पैशांची तर डिझेल दरात 28 पैशांची वाढ करण्यात आली. ताज्या दरवाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल दराने 103 रुपयांची तर डिझेल दराने 95 रुपयांची पातळी ओलांडली.तेल कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरात वाढ केली नव्हती. पण जागतिक …

Read More »