Tuesday , September 17 2024
Breaking News

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी घेतली शरद पवारांची भेट

Spread the love

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विरोधी पक्षांकडून सर्वसहमीने उमेदवार निवडीवर चर्चा सुरु आहे. यामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेत मंगळवारी (दि. १४) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रपती निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (दि.१५) दिल्ली येथे प्रमुख विरोधीपक्ष नेते तसेच बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकी आधी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमुळे चर्चेला चांगले उधाण आले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान होणार आहे आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होऊन नव्या राष्ट्रपतीची घोषणा केली जाणार आहे. सध्याच्या राजकीय गणितानुसार भाजप जो उमेदवार देईल, तो राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहज विजयी होईल असे चित्र आहे. दुसरीकडे मात्र विरोधकांनी मात्र कंबर कसली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव विरोधकांतर्फे सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र शरद पवार यांनी या सर्व चर्चांना विराम देऊन आपण राष्ट्रपतीपदाची उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. शरद पवार मुंबई येथे म्हणाले होते की, ‘मी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत नाही, राष्टपतीपदासाठी मी विरोधीपक्षांचा उमेदवार बनणार नाही’.
काँग्रेसकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला होता. तेव्हा पासून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या नावाच्या चर्चेने जोर धरला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांना सोनिया गांधी यांचा निरोप दिला होता. याशिवाय खर्गे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी सुद्धा फोनवरुन शरद पवार यांच्या नावाची चर्चा केली होती.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार

Spread the love  रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली : ‘अज्ञानातून प्रकाशाकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *