Tuesday , September 17 2024
Breaking News

देश/विदेश

धक्कादायक! ब्लॅक फंगसमुळे मुबंईत तीन मुलांचे काढले डोळे

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसीस)चा धोका वाढत आहे. या आजाराने लहान मुले आणि १६ वर्षांपर्यंतच्या तरुणांना लक्ष्य केले आहे. हा आजार इतका गंभीर रुप धारण करत आहे की, त्यामुळे तीन मुलांचे डोळे काढावे लागले आहेत. ही तीनही मुले वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत होती. याबाबतचे वृत्त एका …

Read More »

गुजरात : ट्रक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू

आणंद : गुजरातमधील आणंद जिल्ह्यात बुधवारी भीषण  अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील तारापूरजवळ एक ट्रक आणि कारची धडक झाली. यामध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. तर जखमींना …

Read More »

DAP खतावरील अनुदानात वाढ, सरकारी तिजोरीवर पडणार १४ हजार ७७५ कोटी रुपयांचा भार

नवी दिल्ली : डाय अमोनियम फॉस्फेट अर्थात डीएपी खतावरील अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना यापुढेही 1200 रुपये प्रती पोते या दराने डीएपी मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. अनुदानात वाढ करण्याच्या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 14 हजार 775 कोटी …

Read More »

पक्षात गोंधळ नाही, आम्ही सारे संघटित

मुख्यमंत्री येडियुराप्पा : अरुण सिंगांच्या आगमनाविषयी औत्सुक्य बंगळूरू : आमच्यामध्ये कोणताच गोंधळ नाही, आम्ही सर्वजण संघटित आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज येथे केले. भाजपचे राज्य प्रभारी अरुणसिंग यांच्या राज्य भेटीच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य उत्सुकतेचे कारण ठरले आहे. दरम्यान, येडियुराप्पा विरोधकानी आपल्या हालचाली सुरूच …

Read More »

कोल्हापूर : मराठा मुक आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी

कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी उद्या (१६) मुक आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरातून होणार आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाची हाक दिली आहे. आता या आंदोलनात वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर सहभागी होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उद्या कोल्हापुरातून सुरु होणाऱ्या मुक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. …

Read More »

महागाई दर 13 टक्क्यांवर; इंधन आणि निर्मिती क्षेत्रातील वस्तूंचे दर गगनाला भिडले

नवी दिल्ली : इंधन आणि निर्मिती क्षेत्रातील वस्तूंचे दर गगनाला भिडल्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यातील सर्वसाधारण महागाई दर (डब्ल्यूपीआय) 12.94 टक्क्यांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. कमी बेस इफेक्टमुळे देखील महागाई निर्देशांक वाढण्यास मदत झाली आहे. गतवर्षीच्या मे महिन्यात हा निर्देशांक उणे 3.37 टक्के इतका होता. सलग पाचव्या महिन्यात महागाई निर्देशांकात वाढ …

Read More »

मराठा कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट

कोल्हापूर  : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार स्पर्धा परीक्षेनंतर नेमणूक   झालेल्या  २१८५   उमेदवारांना  राज्य सरकारने त्वरित नोकरीत सामावून घ्यावे  अशी मागणी मराठा समाजाकडून होत आहे. यासाठी राज्य सरकारने पावलं न उचलून मराठा समाजावर अन्याय केला आहे, त्यामुळे  उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना सकल मराठा समाज्याच्यावतीने त्यांच्या समोर निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने पटीने वाढवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिल्या. ते कोरोना नियंत्रणासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर बोलत होते. तसेच पवार यांनी यावेळी आपल्या जिल्ह्यातील कोरोनाची ही स्थिती कमी करण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूरच्या जनतेला केलं. यावेळी आरोग्यमंत्री …

Read More »

सुशीलकुमारच्या कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ

नवी दिल्ली : पैलवान सागर धनकड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुशीलकुमार याच्या न्यायालयीन कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ करण्याचे निर्देश महानगर दंडाधिकारी रितिका जैन यांनी शुक्रवारी दिले. संपत्तीच्या वादातून सुशीलकुमारने त्याच्या काही सहकाऱ्यांसमवेत सागर धनकड याची ४ मे रोजी बेदम मारहाण करून हत्या केली होती.ऑलिम्पिक स्पर्धेत दोनवेळा पदक पटकाविलेला सुशीलकुमार हा …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळात जून अखेरपर्यंत नवीन चेहऱ्यांना ​संधी मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा सत्तारूढ झालेल्या सरकारला दोन वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहेत. पंरतु, आतापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाचा एकदाही विस्तार करण्यात आलेला नाही. कोरोना महारोगराईमुळे विस्ताराचा मुहूर्त टळत असल्याचे बोलले जात आहे. महारोगराईची दुसरी लाट आता ओसरत आहे, अशात पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली …

Read More »