Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

वंदे भारत एक्सप्रेस लवकरच बेळगावपर्यंत : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव : आता बेळगावकरांसाठी देखील नवीन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे, अशी घोषणा बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली. बंगळूरु-धारवाड दरम्यान सध्या सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस सेवा बेळगाव शहरापर्यंत वाढवण्यासाठी केंद्रीय …

Read More »

ऑपरेशन सिंदुरच्या पार्श्वभूमीवर भाजपचा विजयोत्सव

  बेळगाव : पहेलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदुर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ गुप्त तळांवर अचूक हल्ले करून क्रौर्य गाजवणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्त्युत्तर दिले. याच पार्श्वभूमीवर बेळगाव भाजपच्या वतीने राणी चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिरात विशेष पूजा आयोजित करण्यात आली होती. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. …

Read More »

ऑपरेशन सिंदूरमध्ये बेळगावची सून…

  बेळगाव : बेळगाव ही वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायण्णा, बेळवडी मल्लम्मा यांची क्रांतीची भूमी आहे. जेव्हा देशात क्रांती होते, तेव्हा अर्थातच क्रांतीच्या भूमीची भूमिका देखील असते. ऑपरेशन सिंदूरमध्ये बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील सूनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ही बेळगाव जिल्ह्यातील लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पाकिस्तानी …

Read More »

कांद्याचे दर गडगडले : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

  बेळगाव : काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ-उतार होत होती, मात्र आता त्यात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा विक्रीसाठी एपीएमसीत आलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दर इतका घसरला आहे की, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून येत नाही. बेळगावसह महाराष्ट्रातील कांदा थेट बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये येतो आहे. …

Read More »

मोदी सरकार पाकिस्तानला देईल योग्य उत्तर : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव : पाकिस्तानविरोधी कारवाईबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, असे वक्तव्य बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज केले. केंद्राच्या आदेशानुसार राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांच्या देशात परत पाठवावे, असे निर्देश त्यांनी राज्य सरकारला दिले. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, …

Read More »

जिल्हा परिषदेकडून विक्रमी 110 कोटी करसंकलन

  बेळगाव : बेळगाव जिल्हा परिषदेने यंदा विक्रमी 110 कोटी रुपयांचे करसंकलन केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. पत्रकार संघाच्या संवाद कार्यक्रमात त्यांनी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, खर्च नियंत्रण आणि नवीन प्रकल्पांविषयी माहिती दिली. बेळगाव पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या संवाद कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

  बेळगाव : दहावीच्या बोर्ड परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज मराठी विद्यानिकेतन येथे पार पाडण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर व उपाध्यक्ष श्री. सुरेश पाटील, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सिव्हिल इंजिनियर शुभम अतिवाडकर, सीए स्वप्निल पाटील, ॲड. तृप्ती …

Read More »

बेळगाव-धारवाड थेट रेल्वे मार्ग प्रकल्पातील ६०० एकर जमीन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगाव : बेळगाव-धारवाड थेट रेल्वे मार्ग प्रकल्पातील ६०० एकर जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून रेल्वे विभागाचे अधिकारी एका महिन्यात निविदा मागवतील, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. बेळगाव-धारवार नवीन रेल्वे मार्ग माजी केंद्रीय मंत्री डी. सुरेश अंगडी यांचा हा स्वप्नातील प्रकल्प होता, बेळगाव जिल्ह्यातील ६०० एकर जमीन संपादित करण्याची …

Read More »

पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि परत पाठवा, भाजपची मागणी

  बेळगाव : पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले असतानाही, सिद्धरामय्या सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपने बेळगावात तीव्र आंदोलन छेडले. आज बेळगावात भाजपच्या वतीने भारतात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर हाकलण्याची मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली. झिरो टॉलरन्सचा नारा …

Read More »

जनगणना सर्वेक्षणावेळी भाजप नगरसेवकांनी अधिकाऱ्यावर चढवला आवाज

  बेळगाव : बेळगावात सुरू असलेल्या अनुसूचित जातींच्या अंतर्गत आरक्षणासाठीच्या सर्वेक्षणावेळी भाजप नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी थेट महानगरपालिका उपायुक्तांवरच आवाज चढवून वाद निर्माण केला. यावर काँग्रेसचे आमदार आसिफ सेठ यांनी मध्यस्थी करत शांतता राखण्याचे आवाहन केले. अनुसूचित जातींच्या अंतर्गत आरक्षणासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणावेळी बेळगावमध्ये सोमवारी मोठा वाद उद्भवला. सदाशिवनगरमध्ये महापौर …

Read More »