बेळगाव : ट्रान्सफॉर्मर बसवलेल्या खांबाच्या ठिकाणी विद्युत तारेच्या स्पर्शाने एका म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुर्गामाता कॉलनी, गणेशपुर येथे आज रविवारी दुपारी घडली. विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेली म्हैस दुर्गामाता कॉलनी येथील बाळू अशोक पाटील यांच्या मालकीची होती. पाटील हे आज नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या म्हशी चरावयास घेऊन जात होते. त्यावेळी …
Read More »“वारकरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा” : आमदार शिवाजीराव पाटील
कुद्रेमानी येथील वारकरी भक्तांना पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूरचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठल नामस्मरण, आणि वारकऱ्यांची भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली दिंडी! याच आषाढी वारीच्या निमित्ताने बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावातील विठ्ठलभक्त वारकरी मंडळींची पंढरपूरमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी …
Read More »बेळगावात लोकायुक्तांनी सर्वेक्षकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले!
बेळगाव : लोकायुक्तांनी एका सर्वेक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ही घटना बेळगावातील यमकनमर्डी येथे घडली. सर्वेक्षक बसवराज कडलगी यांना लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडले. त्यांनी ११ई नकाशा तयार करण्यासाठी लाच मागितली होती. प्रकाश मैलकी नावाच्या व्यक्तीने याबद्दल लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. विश्वसनीय माहितीच्या आधारे, लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि बसवराज …
Read More »अनमोड घाटातील रस्ता खचला; 2 सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंदी
दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा तातडीचा आदेश खानापूर : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटातील रस्ता पूर्णपणे खचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. मागील दोन दिवसांपासून जमिनीत भेगा पडत होत्या. अखेर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास संपूर्ण रस्ता दरडीसह खाली कोसळला. या घटनेनंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने आदेश काढून 2 सप्टेंबर 2025 पर्यंत …
Read More »गोकाक यात्रेत बंदोबस्तातील एएसआयचे हृदयविकाराने निधन
बेळगाव : गोकाक येथील यात्रेच्या बंदोबस्तासाठी नियुक्त असलेले सहायक उपनिरीक्षक लालसाब मिरानायक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज सकाळी ६.३० च्या सुमारास गोकाक शहरातील एस.सी./एस.टी. वसतिगृहात वास्तव्यास असलेले हुबळी एपीएमसी पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक ललासाब जीवनसाब मिरानायक (वय ५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. मृत लालसाब यांनी …
Read More »विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीतर्फे सुहास गुर्जर यांचा सत्कार
बेळगाव : सुहास गुर्जर यांनी रिलाएबल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून बेळगांवचे नाव परदेशात उज्वल केले. पण याबाबतचा गर्व त्यांनी कधी केला नाही. हा त्यांचा गुण वाखाणण्यासारखा आहे, असे उद् गार कॉलेज रोड येथील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी काढले. …
Read More »गोकाक यात्रेवेळी हवेत गोळीबार प्रकरणी : रमेश जारकीहोळी यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल
बेळगाव : गोकाक यात्रेत दरम्यान हवेत गोळीबार केल्याच्या प्रकरणावरून भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश जारकीहोळी यांचा मुलगा संतोष जारकीहोळी यांच्याविरुद्ध गोकाक शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील लक्ष्मी देवी यात्रेवेळी संतोष जारकीहोळी यांनी पोलिस आणि जनतेच्या …
Read More »पाटील मळा येथील जुने दुमजली घर कोसळून मोठे नुकसान
बेळगाव : मुसळधार पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी जीर्ण घरे कोसळत असून पाटील मळा येथील एक सुमारे 85 वर्षे जुने दुमजली घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली. सदर घर रामचंद्र गांधी यांच्या मालकीचे असून 1940 मध्ये ते बांधण्यात आले होते. त्यामुळे काळानुसार या घराचे बांधकाम जीर्ण …
Read More »विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा : संत मीरा, अनगोळ शाळेला दुहेरी मुकुट
बेळगाव : गणेशपुररोड येथील गुड शेफर्ड शाळेचे आवारातील बेळगाव टर्फ मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा गणेशपुर हे हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक मुलांच्या गटातील फुटबॉल स्पर्धेचे दुहेरी विजेतेपद अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने पटकाविले. तर खानापूरच्या शांतीनिकेतन स्कूलला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. प्राथमिक …
Read More »मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीवर बंदी
बेळगाव : बेळगाव शहरात मोहरम सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून बेळगाव शहर आणि बेळगाव तालुक्यात शनिवारी (जुलै 05) मद्य विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी जारी केले आहेत. बेळगाव शहरात मोहरम सणाचा शेवटचा दिवस मिरवणुकीचा आहे, त्यामुळे मोहरम मिरवणुकीदरम्यान कोणत्याही अप्रिय घटना घडू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta