Saturday , November 7 2026
Breaking News

गोकाक यात्रेत बंदोबस्तातील एएसआयचे हृदयविकाराने निधन

Spread the love

 

बेळगाव : गोकाक येथील यात्रेच्या बंदोबस्तासाठी नियुक्त असलेले सहायक उपनिरीक्षक लालसाब मिरानायक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज सकाळी ६.३० च्या सुमारास गोकाक शहरातील एस.सी./एस.टी. वसतिगृहात वास्तव्यास असलेले हुबळी एपीएमसी पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक ललासाब जीवनसाब मिरानायक (वय ५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. मृत लालसाब यांनी १९९४ मध्ये पोलिस दलात सेवा सुरू केली होती. ते सध्या गोकाक येथील ग्रामदेवता यात्रेच्या बंदोबस्तासाठी नियुक्त होते आणि एस.सी./एस.टी. वसतिगृहात थांबले होते. तिथेच आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. यासंदर्भात गोकाक शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *